21 वर्षीय महिलेची विहिरीत आत्महत्या पतीसह तिघांना अटक, मेहकर तालुक्यातील माळेगाव येथील घटना…..

Screenshot_2025-12-24-16-31-58-71_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91

मेहकर( बुलढाणा माझा न्युज) मेहकर तालुक्यातील माळेगाव येथील २१ वर्षीय गर्भवती महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली.सविस्तर वृत्त असे की मेहकर तालुक्यातील माळेगाव येथील साधना विष्णू चोडकर (२१) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. हिचा विवाह हा २०२४ मध्ये झाला होता. महिलेने गावातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत आत्महत्या केल्याची माहिती जानेफळ पोलिसांना माळेगाव येथील पोलीस पाटील यांनी दिली. जानेफळ येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला.
मृतक साधना विष्णू चौंडकर महिला ही गर्भवती होती या महिलेचे माहेर वाकदवाडी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम येथील नातेवाईकांनी माळेगाव गाठले. “मुलीला सासरच्या लोकांचा खूप त्रास होता; या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली, असे सांगितले. जोपर्यंत सासू-सासरे व पती अशा तिन्ही आरोपींना अटक करण्यात येत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा संतप्त पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता.
पोलिसांनी तातडीने सासू-सासरे यांना अटक केली. पती विष्णू रामाभाऊ चोडकर याला ‘मोबाईल लोकेशन’ च्या आधारावर अहिल्यानगर येथून अटक करण्यात आली. मृतदेह शवविच्चेदनासाठी मेहकर येथे पाठविण्यात आला होता.

You may have missed

error: Content is protected !!