तांदूळवाडी येथील अंगणवाडीत साने गुरुजी यांची 126 वी जयंती साजरी……
सिदाखेडराजा (अनिल दराडे) तांदुळवाडी अंगणवाडी केंद्र( रूम्हणा-ग्रामपंचायत),जांभोर बीट,सिंदखेड राजा प्रकल्प येथे थोर साहित्यिक,स्वातंत्र्यसैनानी,आदर्श शिक्षक पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजी यांची 126वी जयंती आनंदी आणि उत्साहाचा वातावरणात साजरी करण्यात आली.याप्रसंगी या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून सोयंदेव येथील ग्रामस्थ,उत्कृष्ट शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते व बियाणे उत्पादन क्षेत्र व्यवस्थापकाचे कर्मचारी श्री.सज्जन शेळके सर,प्रमुख पाहुणे म्हणून चांगेफळ येथील ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते श्री.गजानन तायडे या मान्यवरांचा उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली ही जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमास उपस्थित अध्यक्ष श्री.सज्जन शेळके सर यांनी साने गुरुजींची विचारसरणी,त्यांचे जीवनचरित्र,त्यांनी केलेली

देशसेवा,त्याचे शैक्षणिक,सामाजिक कार्यावर त्यांनी प्रकाश टाकला.तसेच त्यांनी शाळकरी मुलांना ‘श्यामची आई ‘ ही साने गुरुजींची रचना याबद्दल मुलांना सविस्तर अशी माहिती दिली आणि मुलांनी ही साने गुरुजींचा विचारांचे अनुकरण करावे हे मोलाचे मार्गदर्शन मुलांना याप्रसंगी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.अध्यक्षांनी ‘खरा तो एकची धर्म’ही साने गुरुजींची रचना याबद्दल देखील अनमोल असे मार्गदर्शन केले.याप्रसंगी सानेगुरुजींचा जीवनावर आधारित जीवनपट मोबाइलचा वापर करुन अंगणवाडीसेविका आणि मदतनीस यांनी उपस्थित विद्यार्थी, पालकवर्ग, ग्रामस्थ यांना दाखविण्याचा प्रयत्न केला.या प्रयत्नाचा माध्यमातून सानेगुरूजींबद्दल सविस्तर माहिती म्हणजेच ‘श्याम ते साने गुरुजी हा सानेगुरूजींचा जीवनप्रवास’ या बद्दल सर्व उपस्थित मंडळीना देण्यात आली.कार्यक्रमास अंगणवाडीतील विद्याथी वेदिका,कोहिनूर,राजवीर तसेच शाळकरी विद्यार्थी पंकज काळे उपस्थित होता व ग्रामस्थांमध्ये देवखेद येथील ग्रामस्थ पवन खरात,तांदुळवाडीतील विजय काळे,जागृती काळे,चंद्रकला खरात,दरूबाई खरात,सुनिता खरात,शशिकला खरात हे सर्व उपस्थित होते. याप्रसंगी अध्यक्ष आणि प्रमुख पाहूणे यांचा हस्ते अंगणवाडीतील विद्याथी आणि शाळकरी मुले यांना शैक्षणिक उपयोगी साहित्य वही आणि खाऊ म्हणून बिस्कीटचा पुडा वाटप करण्यात आला.कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अंगणवाडीसेविका आणि मदतनीस यांनी अथक परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडीसेविका प्रिया तेजकोर प्रकाश खरात यांनी तर कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन मदतनीस सौ.साधना राजरत्न खरात यांनी केले.कार्यक्रमाची सांगता अंगणवाडीतील विद्यार्थ्यांनी साने गुरूजींना अभिवादन करून करण्यात आली.
