प्रा.मधुकर जाधव यांची ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये निमंत्रितांच्या कवी संमेलनासाठी निवड
सिदखेडराजा (अनिल दराडे ) व्यंकटेश महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख प्रा. मधुकर जाधव यांची सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये निमंत्रित कवी म्हणून निवड झाली आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या वतीने दिनांक ०१ ते ०४ जानेवारी, २०२६ दरम्यान विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन संपन्न होणार आहे.
प्रा. मधुकर जाधव यांचा कविता : विशीतल्या आणि मिशीतल्या हा कवितासंग्रह यावर्षीच्या शासनमान्य ग्रंथ यादीत समाविष्ट असून त्यांचा संस्कृती : काल आणि आज हा ललित लेखसंग्रह अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. वृत्तपत्र, दिवाळी अंक व इतर नियतकालिकांमधून प्रा. जाधव यांचे कविता, ललित, प्रासंगिक लेखन सातत्याने प्रकाशित होत असते. विविध कवी संमेलनामध्ये देखील त्यांचा निमंत्रित म्हणून सहभाग असतो.कवी मधुकर जाधव यांच्या काव्यप्रतिभेची ही निवड म्हणजे त्यांच्या सातत्यपूर्ण साहित्य साधनेचा, सर्जनशीलतेचा आणि शब्दसामर्थ्याचा एकप्रकारे सन्मान आहे, अशी भावना साहित्यस्नेही गोतावळ्याच्या वतीने व्यक्त करण्यात येत असून त्यांच्या निवडीबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव, व्यवस्थापन प्रतिनिधी सौ. छायाराजे विजयसिंह जाधव, प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे, प्राध्यापक, विद्यार्थी व साहित्य रसिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
प्रतिक्रिया
“अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठी साहित्यिकांसाठी महत्त्वाचे व्यासपीठ मानले जाते. अशा प्रतिष्ठित संमेलनात निमंत्रित कवी म्हणून सहभागाची संधी मिळणे, ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे.”
