जिजाऊ सृष्टीवर नगराध्यक्ष सौरभ तायडेचां सत्कार
सिंदखेडराजा( अनिल दराडे) मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीचे प्रथम नागरिक नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौरभ तायडे यांचा जिजाऊ सृष्टीवर जिजाऊ जन्मोत्सव सोहळा १२ जानेवारी २०२६ च्या नियोजना साठी आलेल्या केंद्रीय आयोजन समितीच्या वतीने सत्कार घेण्यात आला.याप्रसंगी मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घोगरे आणि जिजाऊ सृष्टीचे अध्यक्ष मधुकर मेहेकरे आणि प्रदेश कार्याध्यक्ष नवनाथ घाडगे,यांनी राष्ट्रमाता जिजाऊची प्रतिमा,मराठा सेवा संघाचे कॅलेंडर, आणि पुस्तक भेट देऊन त्यांचा सत्कार केला.याप्रसंगी विचार पिठावर प्रा.शिवाजी तनपुरे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, जिजाऊ सृष्टीचे सहसचिव सौरभ खेडेकर, प्रकल्प संचालक अरविंद गावंडे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चेके, मुख्य समन्वयक डॉ. मनोहर तुपकर,जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष उर्मिलाताई हाडे, वारकरी परिषदेच्या ज्योतीताई जाधव, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग पाटील,तालुकाध्यक्ष विजय देशमुख यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती,उपस्थितांनी मनोगतात नगराध्यक्ष सौरभ तायडे महाराष्ट्रातील सर्वात तरुण नगराध्यक्ष असून त्यांनी नवीन इतिहास घडवलेला असून राष्ट्रमाता जिजाऊंच्या पावन भूमीत नागरिकांच्या सेवेची संधी त्यांना मिळालेला आहे. योगायोगाने निवडणुकी नंतर १२ जानेवारी २०२६ राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव साजरा होऊ घातलेला आहे.त्यामुळे त्यांनी जिजाऊ नगरीतील सर्व नागरिकांना या महोत्सवात उत्साहाने सहभागी करून घ्यावे तसेच उत्सवादरम्यान जिजाऊ भक्तांना सुविधा पुरविण्याची जबाबदारी घ्यावी अशा अपेक्षा व्यक्त केल्या.याप्रसंगी सत्काराला उत्तर देतानां नगराध्यक्ष सौरभ तायडे म्हणाले जिजाऊ जन्मोत्सव जिजाऊ महाराष्ट्राचा सांस्कृतिक व ऐतिहासिक,उत्सव असून उत्सव नगरीचं वैभव आहे. त्यामुळे सातत्याने माझ्या कालखंडामध्ये मातृतीर्थ सिंदखेडराजाचा विकास कसा होईल याकडेच माझा भर असणार आहे. जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यात मराठा सेवा संघाच्या संयोजन समिती सोबत समन्वय ठेवूण नगराचा नगराध्यक्ष म्हणून मी कमी पडणार नाही असेही त्यांनी मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन विलास तेजनकरनीं केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जिजाऊ सृष्टीवर पदाधिकारी उपस्थित होते.
