आंचरवाडी येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या रेट्याने नवीन डीपी बसवली,अमोल मोरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश…!!
आंचरवाडी ( बुलढाणा माझा न्युज ) येथे गेल्या अनेक दिवसापासून वीज ट्रान्सफॉर्मर (डीपी) क्षमतेअभावी शेतकरी व ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. जुन्या डीपीवर जादा भार असल्याने वारंवार वीज खंडित होणे, शेतीपंप जळणे, त्यामुळे शेतातील पिके सुखायला लागली होती शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान व्हायला सुरुवात झाली होती. या शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नाकडे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अमोल मोरे आणी सुनील मिसाळ यांनी सातत्याने लक्ष वेधले. त्यांनी महावितरण विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. तसेच ग्रामस्थ व शेतकऱ्यांना एकत्र करून संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला होता.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या रेट्यामुळे आणि अमोल मोरे यांच्या चिकाटीच्या पाठपुराव्यामुळे अखेर आंचरवाडी येथे नवीन व क्षमतेची डीपी बसवण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांचा दीर्घकाळापासूनचा प्रश्न मार्गी लागला असून परिसरातील वीजपुरवठा सुरळीत झाला आहे.
नवीन डीपी बसवल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून अमोल मोरे व क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे आभार मानले आहेत. संघटना ही शेतकरी व सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी नेहमीच रस्त्यावर उतरणार असल्याचे यावेळी अमोल मोरे यांनी सांगितले. शेतात डिपी बसवताना गणेश परिहार सहित इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
