राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक हालचालींना वेग; प्रकाश गिते यांची बुलढाणा जिल्हा उपाध्यक्षपदी धडाकेबाज नियुक्ती

Screenshot_2026-01-06-17-38-49-83_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

सिंदखेडराजा (अनिल दराडे) बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला नवे बळ देणारी महत्त्वपूर्ण नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील सिनगांव जहॉंगीर येथील पक्षाचे निष्ठावंत व सक्रिय कार्यकर्ते प्रकाश भिवाजी गिते यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बुलढाणा जिल्हा कार्यकारिणीवर जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती बुलढाणा जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांनी दि. ३ जानेवारी २०२६ रोजी अधिकृत नियुक्तीपत्राद्वारे जाहीर केली असून, त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे. नियुक्तीपत्रात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुलभाई पटेल, लोकप्रिय प्रांताध्यक्ष खा. सुनिलजी तटकरे व बुलढाणा जिल्हाचे कार्याध्यक्ष पालकमंत्री ना. मकरंद आबा पाटील यांच्या विचारधारेचा प्रसार प्रभावीपणे करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

प्रकाश गिते यांनी यापूर्वी सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत ही नियुक्ती करण्यात आल्याचे पक्ष वतूळातून सांगण्यात येत आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांनी मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

You may have missed

error: Content is protected !!