देवा फाऊंडेशन च्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त बिबी परिसरातील पत्रकारांचा गौरव….
बीबी (जयजित आडे ) मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त देवा फाऊंडेशनच्या वतीने लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांच्या लेखन व सामाजिक योगदानाचा गौरव करण्यासाठी बिबी परिसरातील सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन देवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष देवानंद सानप यांनी केले होते.
या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार मधुकर मोहीते, काशिनाथ राऊत,भागवत आटोळे, कृष्णा पंधे , ब्रह्मानंद वाकोडे, रमेश खंडागळे, दिलीप राठोड, अशोक मुंडे, सुनील इंगळे, शरद गीते, सुनील काकड, ऋषी दंदाले, गजानन डोईजड, शीलवंत इंगळे, जयजित आडे, कदीर शहा अकबर शहा, रामप्रसाद जाधव, सय्यद जहीर, मिलन चव्हाण, रवींद्र पवार, रोशन चव्हाण,यांच्यासह अनेक अनुभवी व युवा पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात पत्रकारितेच्या सामाजिक जबाबदारीवर, सत्यनिष्ठ व निर्भीड लेखनाच्या भूमिकेवर मार्गदर्शन करण्यात आले. पत्रकार हे समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य करतात, तसेच लोकशाही मजबूत करण्यासाठी त्यांचे योगदान मोलाचे असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व पत्रकारांचा सन्मान करून त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. देवा फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत असून, अशा उपक्रमांमुळे पत्रकारांना नवी ऊर्जा व प्रेरणा मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
