प्रशासनाला गतिमान करण्याचे काम पत्रकार करतात : प्रा. खडसे
सिंदखेडराजा(अनिल दराडे) ठाणेदार आशिष इंगळे, गट विकास अधिकारी अजित बांगरकिनगावराजाठाणेदार संजय मातोंडकर, तहसीलदार डॉ. प्रवीणकुमार वराडेनायब तहसीलदार नितीन बडे, महिला व बालकल्याण विभागाचे गणेश ढोढळ प्रमुख उपस्थित होते.
सिंदखेडराजा तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सत्कार पोलीस स्टेशनमध्ये आयोजित केला होता. यावेळी अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे म्हणून प्रमुख अतिथी उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम, तहसीलदार अजित दिवटे, पत्रकार मुकुंद पाठक, लोकजागरचे प्रवीन गीते यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाला उपस्थित सर्व पत्रकारांचा शाल, पुष्पगुच्छ आणि भेट देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
संचालन रोहित म्हस्के, आभार प्रदर्शन पोलीस उपनिरीक्षक गणेश डोईफोडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतोसाठी श्रावण डोंगरे, बालाजी सानप, दीपक जयभाये, इरफान सय्यद, शंकर तांबेकर, विकास राऊत, जाकीर पठाण, सलीम परसुवाले, संजय डोंगरे, विठ्ठल आंधळे, जगदीश सानप आदींनी परिश्रम घेतले.
