करवंड शिवारात धोडप येथील शेतकऱ्यावर अस्वलाचा हल्लाहल्यात शेतकरी गंभीर जखमी

Screenshot_2026-01-07-14-20-03-13_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91

निलेश कोल्हे

चिखली:- तालुक्यातील धोडप येथील अल्पभूधारक शेतकरी उत्तम बळीराम परिहार- हे शेतामधे गेले असता अचानक अस्वलाने हल्ला केल्याची घटना ६ जानेवारी मंगळवार रोजी दुपारी १ च्या सुमारास घड़ली. सविस्तर वृत असे की,
उत्तम परिहार हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांनी शेतात हरभरा ,गहू, तूर पेरणी केली असल्यामुळे शेतात पाणी देण्यासाठी गेले असता व जंगली प्राण्यांच्या हैदोसामुळे पीकचे संरक्षण करण्यासाठी त्यांना सकाळी शेतात जावे लागायचेअशातच दि ६ जानेवारी मंगळवार रोजी सकाळी पासून शेतात गेले असता अचानक त्यांच्यावर अस्वलाने दुपारी १ वाजेच्या सुमारास हल्ला चढ़वला.
उत्तम परिहार यांच्यावर अस्वलाने हल्ला केल्याची माहिती मिळताच धोडप येथील सरपंच प्रदीप दामोधर कोल्हे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल होऊन उत्तम परिहार यांना रुग्णवाहिका यांना फोन करून तात्काळ बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. उत्तम परिहार हल्लात ते गंभीर जखमी झाले असून पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात बुलडाणा दाखल येथे आले आहे. अशा घटना घडू नये यासाठी वन विभाग प्रशासनाने जंगली प्राणी यांचा क़ायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी करवंड ,धोडप, पळसखेड सपकाळ गावकऱ्यांनी केली आहे.

You may have missed

error: Content is protected !!