शिवनी ते तालसवाडा रोड परिसरात एका रिक्षाचालक तरुणाची निर्घृण हत्या
मलकापूर( बुलढाणा माझा न्युज) मलकापूर तालुक्यातील शिवनी ते तालसवाडा रोड परिसरात एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये अमोल भाऊराव भवरे (वय 35, रा. धरणगाव) असं मृतकाचं नाव असून त्याची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.सविस्तर वृत्त अशे की आज सकाळच्या सुमारास रस्त्याच्या कडेला संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. प्राथमिक तपासात गळा आवळून हत्या करण्यात आल्याने ही हत्याच असल्याचा संशय अधिकच बळावला आहे. मात्र,नेमकी ही हत्या कोणी व कोणत्या कारणातून केली आहे यासंदर्भात पोलीस कर्मचारी पुढील तपास करत आहेत.
