माऊली हॉस्पिटलच्या २०२६ च्या दिनदर्शिकेचे विमोचन
सिंदखेडराजा( अनिल दराडे)किनगाव राजा येथील माऊली हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर श्री ज्ञानेश्वरजी नागरे यांच्यातर्फे वितरित करण्यात येणाऱ्या वर्ष २०२६ च्या दिनदर्शिकेचे विमोचन माजी मंत्री डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब यांच्या हस्ते आज मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे करण्यात आले.या अवसरावर सिंदखेडराजा नगरीचे माजी नगराध्यक्ष सितारामजी चौधरी, माजी पंचायत समिती सभापती जगन मामा सहाणे, शिवाजीराव राजे, माजी उपनगराध्यक्ष विजुभाऊ तायडे, विठ्ठल माऊली गायके, ठेकेदार नानाभाऊ ठाकरे आदी उपस्थित होते.या दिनदर्शिकेचे विमोचन करताना डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब यांनी माऊली हॉस्पिटलच्या कामाची प्रशंसा केली आणि त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेतली. कार्यक्रमाचे संचालन रोहित म्हस्के यांनी केले आणि आभार प्रदर्शन आनंद राजे यांनी केले
