तारापूर येथील शेतकऱ्याच्या विहिरीतून 28 तासानंतर अस्वलाची सुटका

Screenshot_2026-01-10-12-13-18-41_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91

मोताळा (बुलढाणा माझा न्युज )मोताळा तालुक्यातील एक मादी अस्वल शेतातील विहिरीमध्ये पडले होते सविस्तर वृत्त असे की मोताळा वनपरिक्षेत्रातील तारापूर येथील गजानन रबडे यांच्या शेतातील विहिरीत ही मादी अस्वल पडले. रबडे शेतात आल्यावर त्यांना विहिरीतून ‘ जाणवराचा’ आवाज आला त्यांनी विहिरीत डोकावून पाहिल्यावर त्यांना धीप्पाड अस्वल दिसून आले. यामुळे भयभीत झालेल्या शेतकऱ्याने आधी शेजारच्यांना व नंतर वन विभागाला ही माहिती दिली. ही माहिती वनविभाग कर्मचाऱ्यांना कळतात उप वनसंरक्षक सरोज गवस यांनी तात्काळ यंत्रणेला आदेश दिले आणि अस्वलाच्या रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झाली. सलग २८ तास हे ऑपरेशन चालले! अखेर दुपारी १ वाजताच्या सुमारास अस्वलाला विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले. अस्वलाला बुलढाण्यातील राणी बागेत आणण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर मेटांगळे यांनी तिची प्राथमिक तपासणी केली. सुदैवाने मादी अस्वल पूर्णपणे सुदृढ असल्याने, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तिला अंबाबरवा अभयारण्यात नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले आहे.

You may have missed

error: Content is protected !!