बुलढाणा जिल्ह्यात ‘अरुणोदय’ अंतर्गत सिकलसेल तपासणी मोहीम,१५ जानेवारी ते ०७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान विशेष अभियान….

Screenshot_2026-01-12-09-19-08-95_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91

बुलढाणा( बुलढाणा माझा न्युज )राज्यात सिकलसेल आजाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता नागरिकांचे लवकर निदान, योग्य उपचार व जनजागृती करण्याच्या उद्देशाने ‘अरुणोदय’ ही विशेष सिकलसेल तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यात १५ जानेवारी ते ०७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत व्यापक स्वरूपात सिकलसेल तपासणी केली जाणार आहे.
माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांच्या सूचनेनुसार ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत असून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये व शहरी आरोग्य संस्थांमार्फत तपासणी होणार आहे.
या अभियानात सिकलसेल तपासणी, निदान, समुपदेशन, जनजागृती, मोफत सोल्युबिलिटी चाचणी, इलेक्ट्रोफोरेसिस, एचपीएलसी तपासणी, औषधोपचार व नियमित फॉलोअप यांची सुविधा देण्यात येणार आहे. विशेषतः आदिवासी व ग्रामीण भागातील एकही नागरिक तपासणीपासून वंचित राहू नये, यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.
सिकलसेल आजाराचे वेळेवर निदान झाल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकते. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा व जवळच्या आरोग्य संस्थेत तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

You may have missed

error: Content is protected !!