डोणगाव ग्रामपंचायतीकडून भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणाची मोहीम सुरू….
डोणगाव (आवेज पठाण ) गेल्या काही दिवसांपासून डोणगाव शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला होता. यामुळे लहान मुले, महिला व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही ठिकाणी कुत्र्यांच्या झुंडीने नागरिकांवर हल्ल्याचे प्रकार घडल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायत व पंचायत समितीकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी डोणगाव ग्रामपंचायतीला भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्यासाठी आदेश दिले. त्यानुसार डोणगाव ग्रामपंचायतीने भटक्या कुत्र्यांची धरपकड मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून शहरातील सुरक्षिततेच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची असल्याचे मत व्यक्त होत आहे. यापूर्वीही लोकप्रतिनिधींनी व नागरिकांनी निवेदने देत या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
दरम्यान, मोहीम सुरू झाल्यानंतर काही जणांकडून श्रेय घेण्याची चढाओढ सुरू असल्याचे चित्र दिसत असले तरी, सामान्य नागरिकांच्या मते शहराच्या सुरक्षिततेसाठी उचललेले पाऊल अधिक महत्त्वाचे आहे, असे मत व्यक्त केले जात आहे. यावेळी सरपंच शिवचरण आखाडे उपसरपंच श्याम इंगळे स्वतः हजर असून सफाई कामगार घेणे शर्तीचे प्रयत्न करत कुत्र्यांना पकडली आहे
