जिजाऊ जन्मोत्सवात दे. राजा नगराध्यक्षांना डावलण्याची परंपरा कायम!

IMG-20251222-WA0013

सिदखेडराजा (अनिल दराडे )मातृतीर्थ सिंदखेड राजा व देऊळगाव राजा हे केवळ पंधरा किलोमीटर अंतरावर आहेत. दरवर्षी सिंदखेड राजात जिजाऊ जन्मोत्सव साजरा होत असताना प्रशासनाकडून देऊळगाव राजा येथील नगराध्यक्षांना नेहमीच डावले जाते. साधे निमंत्रण किंवा सोहळ्याचे दिले जात नाही. त्यामुळे प्रशासनाप्रती नाराजी व्यक्त होत असतानाच यापुढे प्रशासनाने नगराध्यक्षांना या सोहळ्यात सहभागी करून घ्यावे, अशी अपेक्षा देऊळगाव राजा येथील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कारांची जननी, स्वराज्याच्या संकल्पनेचे प्रेरणास्थान राष्ट्रमाता, राजमाता माँ साहेब जिजाऊ यांच्या जन्मभूमीवर ९ ते १२ जानेवारी दरम्यान जिजाऊ जन्मोत्सव साजरा होत आहे. सिंदखेड राजा हे छत्रपती शिवरायांचे आजोळ म्हणून जगभर ओळखले जाते. या ऐतिहासिक शहरात जिजाऊ राजवाडा आणि आसपासच्या परिसरात आयोजित होणारा सोहळा इतिहास, संस्कार आणि राष्ट्रप्रेम जागृत करणारा आहे. जन्मोत्सवामुळे शिवप्रेमी आणि इतिहासप्रेमीमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अंतरावर असलेला स्थानीय नागरिक आणि शिवप्रेमींचा आग्रह आहे की, जिजाऊ जन्मस्थळ देऊळगाव राजापासून फक्त १५ किलोमीटर अंतरावर आहे. देऊळगाव राजा नगरपरिषद अध्यक्षांनी भव्य सोहळ्यात सहभाग घ्यावा, अशी जबाबदारी नगर परिषद अध्यक्षांचा सहभाग केवळ औपचारिकता नाही, तर जिजाऊ मातेश्रीच्या जीवनमूल्यांची आणि छत्रपती शिवरायांच्या संस्कारांची खरी जाणीव प्रभावीपणे प्रसारित करणार आहे महत्वाचे ठरेल. प्रशासनाच्या सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सहभागी पालकमंत्री, खा. आमदार व स्थानीय सिंदखेड राजा नगराध्यक्षांना निमंत्रण दिले जाते. मात्र, येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या स्थानीय नागरिक व शिवप्रेमींचा आग्रह आहे की, जिजाऊ जन्मोत्सव देऊळगाव राजापासून आयोजित होणारा सोहळा भव्य व्हावा, अशी जबाबदारी नगर परिषद अध्यक्षांचा सहभाग करून घ्यावा.

स्थानीय नागरिकांनी या सोहळ्यात सक्रीय सहभाग घेऊन जिजाऊ जन्मभूमीवरील गौरवाची अनुभूती घेण्याचे आवाहन केले आहे. आयोजकांच्या मते, प्रशासनाचा व्यापक सहभाग आणि नागरिकांची सक्रीयता एकत्र येऊन हा उत्सव ऐतिहासिक ठरेल आणि भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण बनेल.

सांस्कृतिक कार्यक्रम, इतिहासपर सत्रे, प्रेरणादायी व्याख्याने आणि जिजाऊ माता व छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित विशेष प्रात्यक्षिक आयोजित केली जात आहेत. कार्यक्रम उपस्थितांना इतिहासाचे, संस्कारांचे आणि राष्ट्रप्रेमाचे मूल्य जाणवून देतील.

You may have missed

error: Content is protected !!