बुलढाण्यात जनावरे चोरट्यांचा धुमाकूळ; पाच जनावरे चोरीला!अज्ञात पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा.

Screenshot_2026-01-11-12-06-13-41_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91

बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज )बुलढाण्यातील सुंदरखेड भागातील माऊली पार्क नजीक जनावरे चोरीची खळबळजनक घटना समोर आली आहे. चोरीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून अज्ञात पिक अप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.खामगाव रोडवरील माऊली पार्क भागात ज्ञानेश्वर राजपूत यांचा पशुपालनाचा व्यवसाय आहे. दोघे भाऊ मिळून ते हा व्यवसाय चालवत असतात. दरम्यान, ७ जानेवारीच्या सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर राजपूत यांच्या लहान भावाने जनावरे तीन पत्राच्या गोठ्यात बांधली आणि त्यानंतर कुलूप लावून ते घराकडे निघून गेले होते. परंतु दुसऱ्या दिवशी म्हणजेच ८ जानेवारीच्या सकाळी गोठ्याकडे गेले असता त्यांना दोन म्हशी, दोन वगार दिसून आली नाही. ज्ञानेश्वर राजपूत यांचे बंधू विठ्ठल राजपूत इतरत्र शोध घेतला असता, कुठेही ही जनावरे आढळून आली नाही. इतकेच नाही तर गोट्याचे कुलूपही तुटलेले दिसून आले. यानंतर त्यांनी ज्ञानेश्वर राजपूत यांना फोन करून बोलावून घेतले.परिसरातील नागरिकांना माहिती दिल्यानंतर तेथील काही घरावरील सीसी कॅमेरे तपासले असता त्यामध्ये, आठ जानेवारीच्या पहाटे एका पिक अपमध्ये ही जनावरे नेत असल्याचे दिसून आले, यामुळे राजपूत यांनी तातडीने शहर पोलीस ठाणे गाठून सगळी हकीकत सांगितली. सीसीटीव्हीच्या आधारे अज्ञात पिकप चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. राजपूत यांचे २ लाख ६० हजारांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

You may have missed

error: Content is protected !!