बिबी येथे राजमाता राष्ट्रमाता माँ जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी

IMG-20260113-WA0008

बिबी( जयजित आडे)12 जानेवारी रोजी बिबी येथे राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊ जयंती बिबी गावकऱ्यांच्या वतीने आणि पंचक्रोशीतील जिजाऊ भक्तांच्या वतीने 428वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली स्वराज्याची बीजे रुजवणाऱ्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाला घडवणाऱ्या आणि स्वाभिमान, न्याय व लोककल्याणाचे संस्कार देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी विनम्र अभिवादनकरण्यात आले
धैर्य, विवेक आणि कर्तृत्वाच्या बळावर राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्याच्या स्वप्नाला आकार दिला. केवळ एका महान योद्ध्याची जननी म्हणून नव्हे, तर राष्ट्रघडणीची दूरदृष्टी असलेली प्रेरणास्थान माता म्हणून इतिहासात त्यांचे स्थान अढळ आहे. अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे, स्त्रीसशक्तीकरणाचे आणि समाजाला नैतिक मूल्यांची दिशा देण्याचे कार्य त्यांनी आपल्या आचरणातून घडवले.
राजमाता जिजाऊ यांचा जीवनसंघर्ष आणि विचार आजही समतेच्या, स्वाभिमानाच्या आणि लोककल्याणाच्या लढ्याला बळ देणारा आहे. जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करताना त्यांनी दाखवलेल्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प करून
राजमाता जिजाऊंना विनम्र अभिवादन करण्यात आले
मातोश्री महिला अर्बन बँकेचे संचालक डॉ गायकी साहेब यांचे संकल्पनेतून संत सेवालाल महाराज मंदिरा पासून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत रॅली काढण्यात आली होती तसेच जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी जिजाऊ जयंती कार्यक्रम स्थळी लेझीम नृत्य
सादर केले आणि जिजाऊ वंदनेने माँ जिजाऊ यांना मान वंदना देण्यात आली.
यावेळी बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत पाटील,अभय दादा चव्हाण मा. जि. प. समाज कल्याण सभापती,मा. सरपंच तुळशीराम करपे मामा,
बिबी ग्रामपंचायतचे सरपंच दीपक गुलमोहर, उपसरपंच भास्कर खुळे मा. सरपंच दिलीप बनकर,विठ्ठल आटोळे तंटामुक्ती अध्यक्ष,सर्व ग्रामपंचायत सदस्य सह संदीपभाऊ बनकर,अनिस शेठ, बद्री गावडे,संतोष बनकर, अमोल मुळे, कैलास मुळे,महादेव कांगणे, प्रदीप बनकर,रमेश आंधळे, जाकीर भाई,डॉ. वाघ साहेब,डॉ. काकड साहेब, डॉ, गायकी साहेब, डॉ. राठोड साहेब, बाळासाहेब कुलकर्णी,भास्कर सोळुंके,दीपक गायकवाड, खंदारकर भाऊ,संजू खार्डे,पत्रकार ऋषी दंदाले, पत्रकार कृष्णा पंधें,पत्रकार ब्रम्हानंद वाकोडे, महादेव कांगणे. अशोक नरवाडे. प्रदीप बनकर. प्रवीण इंदूरिया.विठ्ठल वायाळ, श्याम पाटोळे, अतिष तायडे, शत्रुघन चव्हाण (शाहीर)
गणेश डुकरे,धनु कायंदे,परमेश्वर उगलमूगले, पवन दंदाले,अशोक काळे, सतीश रणमळे, राम कुवरजी,संतोष केंद्रे,प्रशांत बनकर, अनुप लाहोटी,पवन बनकर, राम गाडेकर,सह महावितरण कर्मचारी, पोलीस कर्मचारी सह असंख्य जिजाऊ भक्त यावेळी हजर होते

You may have missed

error: Content is protected !!