भादोला येथे स्मशानभूमी तलावाजवळ जुगारावर बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनची धाड, २ लाखांचा मुद्देमाल जप्त….
बुलढाणा( बुलढाणा माझा न्युज) बुलढाणा तालुक्यातील भादोला येथील स्मशानभूमीच्या जवळील तलावाच्या काठावर सुरु असलेल्या जुगारावर रविवारी बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत सात जणांविरोधात गुन्हा दाखल करून २ लाख ६ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सविस्तर वृत्त असे की बुलढाणा तालुक्यातील भादोला येथे तलावाच्या जवळच भादोला येथील काही व्यक्ती जुगार खेळत होती याची माहिती बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक तुकाराम राजपूत यांच्या नेतृत्वाखाली महादेव इंगळे, नारायण गावंडे, ज्ञानेश्वर महाजन यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी धाड टाकली.
कारवाईत सिध्दार्थ रामभाऊ गवई (रा. देव्हारी), शेख करिम शेख नाजीर, अजगर शहा अन्वर शहा, श्याम दामोधर ठेंग, भास्कर विष्णू ठेंग, शेख खलील शेख शालम (सर्व रा. भादोला) आणि भगवान नारायण जाधव (रा. देव्हारी) यांना पोलिसांनी जुगार खेळताना रंगेहाथ पकडले. त्यांची अंगझडती घेण्यात आली. त्यात जुगाराचे साहित्य आणि दोन सुझुकी एक्सप्लेन्डर व एक शाईन अशा चार दुचाकी असा २ लाख ६ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी सात जणांविरुद्ध
बुलढाणा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
