जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा; वाचा निवडणुकांचे वेळापत्रक..

n696807054176830521650560f8a106a58059c13d9996c0a80046f89a318aff8319ba2102b768563dc156f5

बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज)राज्यातील मिनी विधानसभा म्हणून संबोधले जाणाऱ्या जिल्हापरिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. आज राज्य निवडणुक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन या निवडणुकांची घोषणा केली आहे.12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका एकाच टप्प्यात होणार असून त्यासाठी 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार आहे, तर 7 फेब्रुवारी 2026 रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. निवडणुकीची घोषणा होताच आजपासून या सर्व जिल्हापरिषद आणि पंचायत समिती क्षेत्रात आजारसंहिता लागू झाली आहे.

‘या’ 12 जिल्हा परिषदांसाठी होणार निवडणूक

कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव व लातूर या 12 जिल्हा परिषदांचा समावेश आहे.

निवडणूक वेळापत्रक

नामनिर्देशन – पत्र स्वीकारणे १६ जानेवारी २६ ते २१

जानेवारी २६

छाननी – २२ जानेवारी

उमेदवारी माघारी अंतिम मुदत २७ जानेवारी

अंतिम उमेदवार यादी निवडणूक चिन्ह वाटप – २७

जानेवारी दुपारी साडेतीन नंतर

मतदान – ५ फेब्रुवारी

मतमोजणी – ७ फेब्रुवारी सकाळी १० पासून

You may have missed

error: Content is protected !!