राज्यस्तरीय बहुजन जीवन गौरव पुरस्कारप्राप्त पत्रकार प्रताप मोरे यांचा अंढेरा पोलीस ठाण्यात जाहीर सत्कार

IMG-20250706-WA0000

सिंदखेडराजा (अनिल दराडे)चोले साहेबांचा पदभार स्विकारल्यानंतर स्वागत समारंभ गुंजाळा गावचे सुपुत्र आणि अंढेरा परिसरातील संघर्षशील पत्रकार प्रतापराव मोरे यांना नुकताच राज्यस्तरीय “बहुजन जीवन गौरव पुरस्कार”जाहीर झाला. त्यांच्या या यशाचा गौरव करण्यासाठी अंढेरा पोलीस ठाणे येथे विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमात पोलीस ठाण्याचे ठाणेदार रुपेश शक्करगे साहेब सोनकांबळे साहेब यांच्या हस्ते आणि पत्रकार नंदकिशोर देशमुख व हनीफ शेठ यांच्या पुढाकाराने प्रताप मोरे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला
तसेच नुकतेच अंढेरा येथे वन अधिकारी म्हणून पदभार स्विकारलेले चोले साहेब यांचेही यावेळी पत्रकारांनी व पोलीस अधिकाऱ्यांनी हारतुरे देऊन मनःपूर्वक स्वागत केले.
या वेळी अंढेरा गावाचे होमगार्ड जगन नागरे वाढदिवसानिमित्त यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
हा छोटेखानी कार्यक्रम असला तरी, गुंजाळ्याच्या गावातील सुपुत्राला मिळालेला हा सन्मान संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची बाब ठरली. पोलीस व पत्रकार यांच्यातील सौहार्दाचे हे दर्शन गावकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरले .

You may have missed

error: Content is protected !!