मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील प्रकरणावर तीव्र निषेध, जमाअत-ए-इस्लामी हिंद

IMG-20250706-WA0002

मुंबई (एकनाथ माळेकर)राज्याच्या विधीमंडळात राज्याचे विकास मंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने अंतर्गत २,२८९ अपात्र शासकीय कर्मचाऱ्यांना लाभ मिळाल्याचे उघडकीस आले आहे. यावर जमाअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र ने तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांच्या आरोग्य व पोषणासाठी आहे. अशा परिस्थितीत अपात्र व सरकारी कर्मचारी लाभार्थी होणं हे वास्तविक गरजू महिलांवर अन्याय आहे.
जमाअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्रने मागणी केली आहे की केवळ अपात्र नावं वगळणं पुरेसं नाही, या अपात्र लाभार्थ्यांकडून दिलेले पैसे परत वसूल करावेत आणि जबाबदारी निश्चित करावी.
सरकारने सामाजिक कल्याणाच्या योजना पारदर्शक पद्धतीने राबवाव्यात, अन्यथा गरजवंत वंचित राहतिल आणि भ्रष्टाचार फोफावेल, असा इशारा संघटनेने दिला आहे.

You may have missed

error: Content is protected !!