भरधाव मोटरसायकलने अंत्रीखेडेकर येथील रमेश मोरे याना उडवले रमेश मोरे यांचा उपचारा दरम्यान मृत्यू
चिखली (एकनाथ माळेकर )चिखली तालुक्यातील मौजे अंत्रीखेडेकर येथील रमेश गणपत मोरे हे संभाजीनगर येथून आपल्या पत्नीचे उपचार करून अंत्री खेडेकर येथे येत असताना मेरा खुर्द (चौक) येथे उतरले असता भरधाव विना नंबर मोटरसायकलने त्यांना धडक दिली असत ते जागीच खाली पडल सदर घटना हे त्यांच्या पत्नीने त्यांच्या डोळ्यासमोर पाहिली होती रमेश मोरे हे रोड वर जागीच पडले होते त्यांना चिखली येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले परंतु त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला सदर विना नंबर मोटरसायकलचे चालक गोपाल शालिग्राम इंगळे यांनी धडक दिली असल्याची माहिती रमेश मोरे यांच्या पत्नी यांनी अंढेरा पोलीस स्टेशन यांना दिली आहे त्यावरून अंढेरा पोलीस स्टेशन यांनी विना नंबर मोटरसायकल चे चालक गोपाल शालिग्राम इंगळे यांच्याविरुद्ध अंढेरा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे पुढील तपास अंढेरा पोलीस स्टेशनची बिट जमदार करीत आहे
