रखडलेले अनुदान व नुकसान भरपाई ची रक्कम अदा करा-विनायक सरनाईक,पेरणीपुर्वी मिळणारे रब्बीचे अनुदान हरभऱ्याला घाटे लागले तरी मिळेना विनायक सरनाईक यांचा आरोप आंदोलन छेडण्याचा इशारा…..
निलेश कोल्हे
चिखली – शासनाने मोठा गाजा वाजा केला शेतकऱ्यांना रब्बी च्या पेरणीसाठी खते,बियाणेसाठी हेक्टरी १०हजार रु (३हेक्टर मर्यादेत)देण्याची घोषणा केली त्याचप्रमाणे नुकसान भरपाई सुद्धा मंजूर करण्यात आली होती.त्यानंतर काही शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम देखील मिळाली मात्र ति सुद्धा शासन निर्णयानुसार पडली नसल्याने या प्रकरणी मोठा संताप शेतकरी व्यक्त करीत आहेत.आज ही चिखली तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना व्हि के नंबर प्राप्त नाहीत काहींचा नूकसानीच्या यादीत समावेश नाही तर असंख्य शेतकरी रब्बीच्या हेक्टरी १०हजार रु अनुदानातून मुकले तर काहींना क्षेत्रफळ दोन ते तिन हेक्टर असून देखील रक्कम कमी आल्याचे दिसून आले मात्र आता रब्बीची पेरणी झाली हरभरा ला घाटे लागले तरी सुद्धा अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर प्राप्त झाले नसल्याने शेतकऱ्यांना अनुदान मिळणार का?असा सवाल सरनाईक यांनी व्यक्त केला असून एकून शासनाने खरीपाच्या याद्यावरच रब्बीचे अनुदान टाकल्याने किती शेतकऱ्यांना अनुदान मिळाले आणि किती शेतकरी बाकी आहे.याचा ताळमेळ नसल्याचा आरोप केला असून रखडलेल्या शेतकऱ्यांचे अनुदान व नुकसान भरपाई देण्यात यावी,रक्कम प्राप्त व वंचीत शेतकऱ्यांच्या याद्या ग्रामपंचायत स्तरावर प्रसिद्ध करण्यात याव्यात, त्याचप्रमाणे शासन निर्णयानुसार कमी रक्कम मिळालेल्या व तिन हेक्टर जमीन असून देखील दोन हेक्टरचीच अनुदान रक्कम मिळालेल्या शेतकऱ्यांना उर्वरीत रखडलेली रक्कम अदा करण्यात यावी,ज्या शेतकऱ्यांना व्हि के नंबर प्राप्त नाही त्यांना ते देवून रखडलेली नुकसान भरपाई रक्कम अदा करावी अशी मागणी विनायक सरनाईक यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे केली असून आठवडा भरात मागण्यांची पुर्तता न झाल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या तहसिल कार्यालय कृषी विभागात चकरा…
अनेकांना व्हि के नंबर प्राप्त नसल्याने ते नुकसान भरपाई पासुन मुकले आहे.शासनाने नूकसानीच्या याद्या नुसारच रब्बी पेरणीसाठीचे अनुदान देखील टाकल्याने ते देखील शेतकऱ्यांना मिळाले नसल्याचे उदा देता येतील आज सुद्धा शेतकरी नुकसान भरपाई मिळणेच्या अपेक्षेणे तहसिल कार्यालयात चकरा मारत आहे.मात्र व्हि के नंबर च प्राप्त नसल्याने आणि के वाय सीच झाली नाही तर पैसे मिळणार तरी कसे?असा प्रश्न उपस्थित होत आहे.विशेष म्हणजे अनुदान पडले मात्र ज्यांना मिळाले नाही ते विचारणा करावयास गेल्यास शासन स्तरावरुण पडले इतर शेतकरी वंचीत का?राहले विचारणा केल्यास उत्तर मिळत नसल्याने पेरणीपुर्वी मिळणारे अनुदान आज पर्यत खात्यावर प्राप्त नसल्याने शेतकरी अनुदानापासून वंचीत राहणार असल्याची शंका उपस्थित होत आहे.
