श्री कानिफनाथ महाराज यात्रा महोत्सव २०२६

IMG-20260117-WA0020

कवठळ (एकनाथ माळेकर ) – दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री चैतन्य कानिफनाथ गडावर रविवार, दि. १८ जानेवारी २०२६ रोजी श्री कानिफनाथ महाराज यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने साजरा होणार आहे. यात्रेच्या निमित्ताने दिवसभर धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून हजारो भाविकांच्या उपस्थितीत यात्रा पार पडण्याची अपेक्षा आहे.
यात्रेचा विशेष ठरलेला काठी मिरवणूक सोहळा दुपारी १ वाजता सुरू होऊन ४ वाजेपर्यंत पार पडणार आहे
. त्यानंतर भाविकांसाठी पुरी-भाजीचा महाप्रसाद बारी पद्धतीने जिल्ह्यातील साधुसंत, मान्यवरांच्या उपस्थितीत तसेच तेजस्वी महाराज संस्थान वरोडी येथील सेवाधारी महिला गटाच्या हस्ते वितरीत केला जाणार आहे.
संध्याकाळी ८ वाजता रसिक प्रेक्षकांसाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सुप्रसिद्ध लावणी नृत्यकलाकार अमोल जायभाये तसेच शिवमल्हार वगनाट्य मंडळ, पाचडगांवकर (जि. जालना) यांचे कार्यक्रम सादर होणार असून प्रेक्षकांना मनोरंजनाचा मनमुराद आनंद घेता येणार आहे.
कार्यक्रमासाठी भाविक व मान्यवरांना आदरपूर्वक निमंत्रण देण्यात आले आहे. “प्रत्यक्ष भेट देऊन किंवा फोनवर निमंत्रण देण्याचा मानस होता; मात्र यात्रेच्या व्यस्त नियोजनामुळे ते शक्य झाले नाही,” असे गणेश वाघमारे व कवठळ ग्रामस्थांनी कळविले.

You may have missed

error: Content is protected !!