स्वप्नपूर्ती स्कूल&ज्यु.काॅलेज,अंचरवाडी येथे रविवार स.11 वाजता आदर्श सरपंच मा.भास्करराव पेरे पाटील यांचे मार्गदर्शन…..
अंचरवाडी:- स्वप्नपूर्ती स्कूल&ज्यु.काॅलेज,अंचरवाडी येथे दि.18/01/2026 रविवार ला वार्षिक स्नेहसंमेलन Heritage 2026 चे उद्धाटन व मार्गदर्शन करण्यासाठी सकाळी ठिक 11 वाजता स्वप्नपूर्ती स्कूल अंचरवाडी येथे मा.श्री.भास्करराव पेरे पाटील येत आहेत..दि.18 व 19 जानेवारी या दोन दिवशीय कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे सांस्कृतीक कार्यक्रम,आनंद मेळावा,वेशभुषा स्पर्धा व महिलांसाठी हळदी-कुंकू,विविध स्पर्धा या सर्व कार्यक्रमांचे अतिशय भव्यदिव्य व नियोजनबद्ध आयोजन करण्यात आलेले आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.एकनाथराव परिहार हे भुषवणार असुन सचिव मा.श्री.समाधान परिहार व कोषाध्यक्ष मा.श्री.रविंद्र परिहार,शाळेच्या प्राचार्या,सर्व कर्मचारी व विद्यार्थी यांनी सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन केलेले आहे.
