मराठा क्रांती मोर्चाचा दबाव: विष्णू भगवान मूर्ती दर्शनासाठी खुली…

सिंदखेड राजा(अनिल दराडे) मराठा क्रांती मोर्चा राज्यसमनक महेश भैया डोंगरे पाटील व अशोक राजे जाधव यांच्या वतीने नऊ जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत विष्णू भगवान यांची पुरातन मूर्ती दर्शनासाठी खुली करण्याची मागणी करण्यात आली होती. गेल्या एक-दीड वर्षापासून बंद असलेली मूर्ती प्रशासनाने व पुरातत्त्व खात्याने दर्शनासाठी खुली करावी अन्यथा मराठा क्रांती मोर्चा व छावा संघटना खुली करेल असा इशारा देण्यात आला होता.
शासन व प्रशासनाने त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी व प्रशासनाच्या वतीने अखेर मूर्ती दर्शनासाठी 12 जानेवारी रोजी खुली करण्यात आली. शासन प्रशासन यासाठी सर्व पत्रकार बांधवांनी मीडिया प्रिंट मीडिया सर्वांनी सहकार्य केले त्या सर्वांचे मराठा क्रांती मोर्चा छावा संघटनेच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
