एकाच ठिकाणी सतत दोन दिवस लांडग्याचा हल्ला पहिल्या दिवशी बकऱ्या तर दुसऱ्या दिवशी एक वासरू, वन्य प्राण्यांचा वावर वाढला भरोसा येथील शेतकऱ्याच्या गाेठ्यातील चार बकर्या व चार बोकड व वासरू लांडग्याचा हल्ला शेतकरी चिंतेत….
बुलढाणा( एकनाथ माळेकर) चिखली तालुक्यातील मौजे भरोसा येथील शेतकऱ्याच्या गाेठ्यातील बकर्यावर लांडग्यांनी हल्लात ठार केल्या तसेच गंभीर जखमी झाली़ ही घटना 18 जानेवारीला वार रविवार रात्री दिड ते दोन वाजेदरम्यान घडली आहे तर 19जानेवारी ला गाईचे वासरू मारले तर गाईचे कान लांडग्याने तोडले आहेया घटनेमुळे अल्पभूधारक शेतकऱ्याचे ऐंशी ते नव्वद हजाराचे रुपयांचे नुकसान झाले
भरोसा येथील शेतकरी दिलीप सुदाम थुटटे यांचे भरोसा भाग1गट नं 321 अंचरवाडी रस्त्यावर शेत आहे़ त्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून शेळी पालन व्यवसाय सुरु केला होता़ त्यांनी आपल्या शेतातील गोठ्यात बकर्या बांधल्या व बोकड बांधले होते 18जानेवारी रोजी रात्री लांडग्यांनी त्यांच्या कोठ्यावर अचानक हल्ला करून बकर्या व बोकड ठार केले ही घटना 19जानेवारी रोजी सकाळी आठ वाजेदरम्यान राेजी उघडकीस आली़
घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विश्वास वानखेडे, वनरक्षक गजानन पोटे अंचरवाडी बीट भाग 1चे तलाठी मगर मॅडम यांनी घटनास्थळावर भेट दिली़ वन विभागाचे वनरक्षक गजानन मा पोटे ,किसना थुटटे, अशोक थुटटे यांनी घटनेचा तातडीने पंचनामा केला़
झाले नुकसान शेतकरी दिलीप सुदाम थुटटे यांचे नुकसान झाले आहे़ लांडग्यांनी त्यांच्या बकर्या बोकड ठार केले आहे़ व वासरू यांचे सुद्धा कान तोडले आहेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यास मदत देण्याची मागणी हाेत आहे़. सदर घटनेबाबत वनविभागाचे कर्मचारी गजानन पोटे यांच्याशी दूरध्वनी भरून संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की सदर घटनेची तक्रार ऑनलाइन आणि ऑफलाइन ऑफिसला दया आम्ही शेतकरी यांना वाऱ्यावर सोडणार नाही वन्यप्राण्यापासून झालेल्या नुकसानीचा मोबदला वनविभागा मार्फत देण्यात येतो त्यासाठी रीतसर अर्ज सादर करावा लागेल आशी माहीती वनविभागाचे वनरक्षक गजानन पोटे यांनी बुलढाणा माझा शी बोलताना दिली आहे
