बुलढाणा शहर पोलीसांनी हरविलेले एकुण 54 मोबाईल हस्तगत करुन मुळ मालकास केले सुपुर्त….

IMG-20260120-WA0016

बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज )पोलीस स्टेशन, बुलढाणा शहर अंतर्गत कार्यान्वीत असलेले CENTRAL EQUIPMENT IDENTITY REGISTER (CEIR) या पोर्टलचा वापर करुन बुलढाणा शहर पोलीसांनी बुलढाणा शहर पोलीस स्टेशन हद्दीत हरविलेल्या मोबाईलचा शोध घेवुन मागील महीण्यात CEIR पोर्टलच्या माध्यमातुन 38 मोबाईल हॅन्डसेट व तपासाच्या माध्यमातुन 16 मोबाईल हॅन्डसेट असे वेग-वेगळया कंपनीचे एकुण 54 मोबाईल हॅन्डसेट हस्तगत केले.

हस्तगत केलेल्या मोबाईलचे मुळ मालकाचा शोध घेवुन मालकी हक्काबाबत खात्री करुन हस्तगत करण्यात आलेले एकुण 54 मोबाईल हॅन्डसेट अंदाजे 10 लाख रुपये किंमतीचे मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र, अमरावती, मा. पोलीस अधीक्षक, बुलढाणा श्री. निलेश तांबे, मा.अपर पोलीस अधीक्षक, खामगाव श्री. श्रेणीक लोढा, मा. अपर पोलीस अधीक्षक, बुलढाणा श्री. अमोल गायकवाड, मा. Pro IPS श्री. अदित्य सिंग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, बुलढाणा, श्री. सुधीर पाटील व ठाणेदार रवि राठोड, पो.स्टे. बुलढाणा शहर यांच्या प्रमुख उपस्थीतीत मुळ मालकांना परत केले आहे.
हि कारवाई मा. पोलीस अधीक्षक, बुलढाणा श्री. निलेश तांबे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अमोल गायकवाड, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुधीर पाटील यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन बुलढाणा शहरचे ठाणेदार श्री. रवि राठोड यांनी व पोलीस स्टेशन स्तरावर CEIR पोर्टलचे कामकाज पाहणारे पोलीस अधिकारी पोउपनि, रवि मोरे व पोलीस अमलदार पोकॉ. युवराज शिंदे वनं-2177, पो.कॉ. दिपक चव्हाण बनं-1207 व पोकॉ. विनोद बोरे बनं-425, पो.कॉ. मनोज सोनुने वनं-1184 व महीला पोलीस अंमलदार मपोकॉ. मोहीनी चव्हाण बनं-2328 यांनी केली आहे.

You may have missed

error: Content is protected !!