मराठा सेवा संघाच्या वतीने सन्मान अशोक राजे जाधव
सिंदखेड राजा(अनिल दराडे ) दि. १९ जानेवारी – १२ जानेवारी निमित्त महाराष्ट्रातून येणाऱ्या मराठा सेवा संघ महिला ब्रिगेड यांच्या वतीने मशाल रॅली काढण्यात आली. या रॅलीतील महिलांना माजी मंत्री आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांच्या वतीने महेश भैय्या डोंगरे पाटील हे गेल्या सात वर्षापासून रॅलीतील हजारो महिलांना जेवण्याची व्यवस्था करतात.
येणाऱ्या महिलांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी महेश भैय्या डोंगरे पाटील यांच्यासह सर्व सहकाऱ्यांच्या वतीने उत्कृष्ट नियोजन करण्यात आले. यासाठी मराठा सेवा संघाच्या वतीने आमदार सिद्धार्थ जी खरात साहेब यांच्या हस्ते जिजाऊ स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आले.
या कार्यक्रमात शिवसेना नेते छगन दादा मेहेत्रे, प्रदीप बिल्लोरे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष मधुकरराव गव्हाड सर, डॉक्टर कळकुंबे, एडवोकेट हाडे साहेब, सवडे सर, खरात सर, बापू देशमुख, सुभाष खांदवे, छावा संघटनेचे बाळासाहेब शेळके, रामभाऊ बोंद्रे, वैजिनाथ कुडे, उद्धव शेरे, मुरलीधर राठोड, भगत तायडे, बाबासाहेब पुरंदरे यांच्यासह मराठा सेवा संघ व छावा संघटनेचे पदाधिकारी व सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सर्व मराठा सेवा संघ व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आभार व्यक्त करण्यात आले
