मागील वर्षापासून अपुर्ण अवस्थेत बंद असलेला खंडाळा ते चोरपांग्रा (शिव )शेत रस्त्याच्या कामाला सुरुवात करा अन्यथा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांसह जलसमाधी घेण्याचा शेतकरी नेते सहदेव लाड यांचा इशारा….
बिबी( जयजीत आङे )जवळपास मागील दीड वर्षापासून खंडाळा शिव रस्ता ते चोरपांग्रा तलावाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अपूर्ण आहे सदर रस्त्याचे काम 25 जानेवारी पर्यंत मार्गी न लागल्यास 26 जानेवारी रोजी शेतकऱ्यांसह चोरपांग्रा तलावात जलसमाधी घेण्याचा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी तहसीलदार लोणार व गटविकास अधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे,
खंडाळा शिवरस्ता हा चोरपांग्रा तलावाकडे जाणारा एकमेव मुख्य रस्ता आहे परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी चोरपांग्रा तलावावरून शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी देण्यासाठी चोरपांग्रा तलावामध्ये मोटार पंप आहे त्यामुळे शेतातील मोटार सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना या रस्त्याने जाणे येणे करावे लागते त्यामुळे हा रस्ता तात्काळ पूर्ण होणे फार गरजेचे आहे परंतु प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे सदर रस्ता हा गेल्या कित्येक दिवसापासून बंद अवस्थेत पडला आहे तरी या रस्त्याचे काम येत्या 25 जानेवारीपर्यंत सुरू न केल्यास 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांसह चोरपांग्रा तलावामध्ये जलसमाधी घेण्याचा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी दिला आहे,
निवेदनावर अनिल लांडगे अविनाश राठोड यांच्यासह अन्य शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत
