ई-पीक पाहणीची अंतिम मुदत २४ जानेवारीनोद न केल्यास विमा व अनुदानाचा लाभ मिळणार नाही : तहसिलदार अजित दिवटे

IMG-20260120-WA0039

सिंदखेडराजा (अनिल दराडे) रबी होमांतील ई-पीक पाहणी (Digital Crop Survey – DCS) अंतर्गत शेतकऱ्यांनी २४ जानेवारी पर्यंत पीक नोंदणी करणे अनिवार्य असून, मुदतीत नोद न केल्यास ७/१२ उताऱ्यावर पीक पेरणा कोरा राहणार होईल. त्यामुळे शेतकरी विमा, शासकीय अद्ययावत विविध कृषी योजनांच्या लाभापासून शेतकरी वंचित राहतील, असे इशारा तहसिलदार अजित दिवटे (सिंदखेडराजा) यांनी दिला आहे.

१० डिसेंबर २०२५ पासून रवि हंगामासाठी ई-पीक पाहणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःच्या आँड्रॉइड मोबाईलवर शेतावर जाऊन पीक पेरण्याची नोद करणे आवश्यक आहे. अंतिम मुदतीच्या अंमलबजावणी अनेक क्षेत्रावरील नोदणी अपूर्ण असल्याने प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे.

DCS वर्जन 4.0.5 हे अँप वापरने आवश्‍यक असून, अँप वापरून गुगल क्रोम अँपडेट करूनच प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ई-पीक पाहणी न केल्यास भविष्यात अवेळी पाऊस, गारपीट किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शासकीय भरपाई मिळण्यात अडचणी येतील, असेही तहसिलदार दिवटे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणतीही दिरंगाई न करता २४ जानेवारीपूर्वी ई-पीक पाहणी पूर्ण करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

कोमन सर्विस सेंटर (CSC) यांची मदत घ्यावी, असे आवाहन तहसील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

You may have missed

error: Content is protected !!