अरुणोदय सिकलसेल अॅनिमिया विशेष अभियानांतर्गत ब्रम्हपुरी (वाडी) येथे जनजागृती..

IMG20260120123430

बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज) 20 जानेवारी 2026 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, किन्होळा (ता. बुलढाणा) येथे मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांच्या मार्गदर्शनाखाली अरुणोदय सिकलसेल अॅनिमिया विशेष अभियान अंतर्गत सुरू असलेल्या विविध उपक्रमांची जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी राजेश धुताडमल व जिल्हा स्तरीय पर्यवेक्षक श्री. सुजीत हिवाळे, श्री. विजय जाधव व श्री. गवई यांनी पाहणी केली.
यावेळी उपकेंद्र केळवद येथे भेट देऊन मोहिमेच्या प्रगतीची सविस्तर माहिती घेण्यात आली.
तसेच ब्रम्हपुरी (वाडी) येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना सिकलसेल आजाराबाबत मार्गदर्शन करून सिकलसेल आजाराची लक्षणें सांगुन जनजागृती करण्यात आली. गावामध्ये सुरू असलेल्या सिकलसेल गृहभेटी व सर्वेक्षणादरम्यान संबंधित कुटुंबांना भेट देऊन माहिती व विचारपूस करण्यात आली.
या मुख्याध्यापक श्री. दीपक पाटील, आरोग्य सेवक श्री. कुलदीप सावळे, आरोग्य सेविका सौ. वैशाली मगर, आशा स्वयंसेविका सौ. अर्चना अंबोरे, मदतनीस वेदिका मोरे व अंगणवाडी सेविका सौ. लिला जाधव उपस्थित होत्या.
अरुणोदय अभियानांतर्गत सिकलसेल आजाराबाबत तपासणी, जनजागृती व समुपदेशन या उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळत असून आरोग्य विभागामार्फत प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

You may have missed

error: Content is protected !!