सर्वांना सोबत घेऊन चला-आदर्श सरपंच मा.भास्करराव पेरे पाटीलस्वप्नपूर्तीचा दोन दिवशीय सांस्कृतीक महोत्सव(Heritage) व चतुर्थ वर्धापनदिन उत्साहात संपन्न…मातृशक्ती,पुरुष व युवकांची रेकाॅर्डब्रेक उपस्थिती

अंचरवाडी:- स्वप्नपूर्ती स्कूल&ज्यु.काॅलेज,अंचरवाडी येथे दि.18 व 19 जानेवारी या दोन दिवशीय सांस्कृतीक महोत्सव व चतुर्थ वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.विद्यार्थ्यांचे भरगच्च सांस्कृतीक कार्यक्रम,आनंद मेळावा,वेशभुषा स्पर्धा,महिलांसाठी हळदी-कुंकू,विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

या सर्व कार्यक्रमासाठी महत्वाचे आकर्षण कार्यक्रमाचे उद्घाटक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त,जीवन गौरव पुरस्कार प्राप्त आदर्श सरपंच,आदर्श ग्राम पाटोदा मा.भास्करराव पेरे पाटील यांची उपस्थिती कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष मा.एकनाथराव परिहार यांनी स्थान भुषविले सर्वप्रथम वाजत गाजत मिरवणूक काढुन गावातील भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर,बोधीसत्व गौतमबुद्ध,छत्रपती शिवाजी महाराज,महाराणा प्रतापसिंहजी या महापुरुषांच्या स्मारकांचे पुजन करण्यात आले.

गावात स.11 वाजता मा.पेरे पाटील यांचे आगमन झाल्यावर ढोल ताशाच्या गजरात मा.पेरे पाटीलांची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणूकीत समस्त गावकरी व परिसरातील गावच्या लोकांची तोबा गर्दी उसळली होती.शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्यांचे उत्साहात स्वागत केले.सर्वप्रथम पेरे पाटील यांची आठवण म्हणून त्यांचे हस्ते केशर आंब्याचे रोप लावून वृक्षारोपण करण्यात आले. मा.पेरे पाटील यांनी अतिशय मनमोकळ्या शैलीत मनोरंजक व गांभीर्यपुर्वक त्यांनी ग्राम पाटोदा गावाचा कायापालट कशारीतीने केला हे सांगीतले,जिवनात पुर्वजांचा वसा,वारसा चालविण्याचा संदेश दिला राजकारण,समाजकारणात चांगल्या लोकांनी प्रतिनिधीत्व करावे असा सल्ला दिला तसेच”स्वप्नपूर्ती स्कूल”ही सर्वांना सोबत घेऊन चालणारी संस्था असुन आपणही सर्वांना सोबत घेऊन चालले पाहिजे शाळेचा निसर्गरम्य परिसर पाहुन कौतुक केले व विकासासाठी भरभरुन शुभेच्छा दिल्या गावाबद्दलही गौरवोद्गार काढले.

संस्थेचे सचिव मा.समाधान परिहार यांनी अतिशय जोशपूर्ण,अभ्यासपूर्ण प्रास्ताविकात अल्पावधीत झालेली संस्थेची प्रगती,वर्षभर राबवत असलेले उपक्रम,भविष्यातील नियोजन,विविध स्पर्धा परिक्षेत विद्यार्थ्यांनी संपादन केलेले यश,मातृशक्तीत असलेली क्षमता याबद्दलही थाॅमस एडिसन यांचे उदाहरण देऊन वातावरण भारुन टाकले.संस्थेचे कोषाध्यक्ष मा.रविंद्र परिहार यांनी मान्यवरांचे स्वागत करुन आभार मानले या प्रसंगी ग्रा.पं.अंचरवाडीच्या प्रथम नागरीक सरपंच सौ.कोकीळाताई परिहार,उपसरपंच सौ.ज्योतीताई परिहार,सचिव खेडेकर साहेब व सर्व ग्रा.पं.सदस्य अंचरवाडी यांचे मा.पेरे पाटील यांनी ग्रा.पं.ला आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल स्वागत केले तसेच सांस्कृतीक महोत्सवात शाळेच्या विद्यार्थ्यांनी बहारदार सांस्कृतीक कार्यक्रमाचे सादरीकरण केले,वेशभुषा स्पर्धा,नृत्य,नाटिका,अभिनय तसेच महिलांचा हळदी-कुंकू कार्यक्रम संस्थेच्या संचालक सौ.अनुसयाताई परिहार,सहसचिव सौ.आशाताई परिहार,उपाध्यक्षा सौ.अलकाताई परिहार,प्राचार्या सौ.गाताडे मॅडम व सर्व शिक्षिका यांनी आयोजित करुन भेटवस्तुचे वाटप केले.या सर्व कार्यक्रमासाठी मा.एकनाथराव थुट्टे मा.जि.प.सदस्य,मा.अशोकराव पडघान मा.जि.प.सभापती,मा.पांडुरंग पाटील भुतेकर,संचालक बाजार समिती,मा.ज्योतीताई खेडेकर मा.जि.प.सदस्य,मा.समाधान पाटील संचालक बाजार समिती,मा.साहेबराव पाटील परिहार मा.सरपंच,मा.कृष्णा मिसाळ संचालक बाजार समिती,मा.गजानन परिहार मा.संचालक बाजार समिती,मा.गजाननराव वायाळ उपाध्यक्ष रा. काॅ.श.प.,मा.विकास मिसाळ जिल्हासरचिटणीस रा.काॅ.श.प.,मा.संतोष काळे पाटील जिल्हाध्यक्ष युवामोर्चा भाजपा,मा.सचिन बोंद्रे कृषिमित्र चिखली,मा.सुरेंद्रसिंह ठाकुर नगरसेवक चिखली,मा.प्रसन्न विष्णु घुबे पाटील,मा.रामचंद्र शिंदे मा.सरपंच,मा.सौ.सुरेखाताई राजे सरपंच शे.आ.,मा.प्रल्हाद इंगळे सरपंच अमोना,मा.मधुकरराव वाघ मा.सरपंच,मा.शिवदास भांदर्गे ग्रा.पं.सदस्य अमोना,मा.सखाराम परिहार तंटामुक्ती अध्यक्ष,मा.इंदरसिंग परिहार मा.सरपंच,मा.अरुण पवार मा.पं.स.सदस्य,मा.ज्ञानेश्वर परिहार मा.सरपंच,मा.सौ.धृपदाबाई जायभाये मा.सरपंच,मा.विष्णु सोळंकी मा.सरपंच,मा.सौ.ज्योतीताई सोळंकी संचालक स्वप्नपूर्ती,मा.सौ.वर्षाताई परिहार संचालक शिक्षक पतसंस्था,मा.गणेशसिंह परिहार,मा.शाम राठोड,मा.संजय गवई,मा.ज्ञानेश्वर चव्हाण ग्रा.पं.सदस्य,मा.संजय परिहार मा.उपसरपंच,मा.संजय परिहार मा.ग्रा.पं.सदस्य,मा.कृष्णा सपकाळ जिल्हासचिव भाजपा,मा.खेडेकर साहेब ग्रामविकास अधिकारी,मा. एस.बी.परिहार से.नि.मु.अ.,मा.शंतनू बोंद्रे जिल्हाकार्याध्यक्ष रा.काॅ.अ.प.,मा.संतोष परिहार तालुकाध्यक्ष रा.काॅ.अ.प.,मा.बाळासाहेब गव्हाणे स्वीय सहा.मा.आ.श्वेताताई महाले,मा.यु.टी.परिहार रा.उपाध्यक्ष शिक्षक संघ,मा.नंदकिशोर सुसर जि.अध्यक्ष म.रा.जु.पें.ह.संघटन,आदर्श शिक्षक संतोष लव्हाळे,गजानन परिहार,विलास पर्हाड,विनोद जाधव,शरद जाधव,मा.तेजराव गवई मा.ग्रा.पं.स.,मा.सदाशिव खिल्लारे,मा.सौ.गोदावरीताई शिंदे सरपंच मंगरुळ,मा.डाॅ.विजय वायाळ शे.आटोळ,मा.नेवरेभाऊ भोकर,सर्व पालकवर्ग,विद्यार्धी,या सर्व कार्यक्रमाचे नियोजन, प्राचार्या,सर्व कर्मचारी यांनी मेहनत घेऊन यशस्वी केले.
