“ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या”बुलढाणा जिल्हा संघटक पदी पत्रकार कैलास आंधळे यांची निवड.
बुलढाणा (एकनाथ माळे कर) जिल्ह्यातील ग्राहकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी ,कार्यरत असलेली भारत सरकार नोंदणीकृत “भारत सरकार माणुसकी सोशल फाउंडेशन” संचालित” ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या” बुलढाणा जिल्हा संघटक पदी मेरा बुद्रुकचे पत्रकार कैलास आंधळे यांची नव्याने नियुक्ती झालेली आहे.ही नियुक्ती ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे “राष्ट्रीय अध्यक्ष” दादाभाऊ केदारे तसेच राष्ट्रीय सचिव अविनाश झोटिंग यांनी केली आहे.तसेच विदर्भाध्यक्ष सचिन खंडारे,विदर्भ कार्याध्यक्ष सुनील अंभोरे ,बुलढाणा जिल्हा अध्यक्ष डॉ.शालिग्राम चव्हाण,डॉ.गंगाराम उबाळे यांच्या मार्गदर्शनातून ही नियुक्ती झालेली आहे.बुलढाणा जिल्हा संघटक पदी मेरा बुद्रुक चे पत्रकार कैलास आंधळे यांचा सामाजिक,शैक्षणिक,राजकीय तसेच विविध क्षेत्रात दांडगा अनुभव असून.सध्या ते पत्रकार म्हणून काम पाहत आहेत.त्यामुळे त्यांच्या या कामाचा नक्कीच जनतेच्या तसेच ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी फार मोठी मदत व फायदा होणार आहे.बुलढाणा जिल्ह्यातील ग्राहकांना न्याय देण्याचे काम माझ्या हातून घडत आहे. व माझी निवड बुलढाणा जिल्हा संघटक पदी केल्याबद्दल “राष्ट्रीय अध्यक्ष” दादाभाऊ केदारे तसेच राष्ट्रीय सचिव विदर्भ अध्यक्ष व बुलढाणा जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांचे आभार त्यांनी मानले आहे.चांगल्या प्रकारचे ग्राहकांच्या समस्येचे निवारण करण्यासाठी कटिबद्ध आहे ,अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे.
त्यांच्या या ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती “जिल्हा संघटक पदी जिल्हा संघटक पदी “निवडीमुळे जिल्ह्यासह, चिखली तालुक्यातुन तसेच सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
