व्हाईस ऑफ मीडिया तालुका पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी बिनविरोध जाहीर

IMG-20260123-WA0004

देऊळगाव राजा( एकनाथ माळेकर) तालुक्यातील पत्रकार संघटनात्मक बांधिलकी अधिक भक्कम करण्याच्या दृष्टीने व्हाईस ऑफ मीडिया तालुका पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी आज देऊळगाव राजा येथील शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या बैठकीत बिनविरोध व एकमताने जाहीर करण्यात आली. सदर बैठक तालुका अध्यक्ष अर्जुनभाऊ आंधळे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
यावेळी तालुका अध्यक्षपदी विलास जगताप, उपाध्यक्षपदी विजय जाधव व शेख हनीफ, सचिवपदी संमती जैन, कोषाध्यक्षपदी पूजा कायंदे, सहसचिवपदी गजानन भालेकर, तर प्रसिद्धीप्रमुखपदी नंदकिशोर देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नव्या कार्यकारिणीच्या निवडीमुळे तालुक्यातील पत्रकारांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रसंगी व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील मतकर, जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, तसेच ज्येष्ठ पत्रकार प्रदीप हिवाळे, रमेश चव्हाण, अमोल बोबडे, गजानन घुगे, देवानंद झोटे, खंडू माटे आदी मान्यवर पत्रकार बांधव उपस्थित होते. तालुक्यातील सर्व व्हाईस ऑफ मीडिया पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय भाषणात अर्जुनभाऊ आंधळे यांनी, “पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण, निर्भय व सत्यनिष्ठ पत्रकारिता, तसेच तालुक्यातील सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी संघटना अधिक सक्रिय राहील,” असा विश्वास व्यक्त केला. नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांनीही संघटनेच्या माध्यमातून पत्रकार बांधवांच्या समस्या, प्रशिक्षण, एकजूट व सामाजिक जबाबदारी यावर भर देण्याचा निर्धार व्यक्त केला.
ही वाचकांपर्यंत पोहोचल्यास तालुक्यातील पत्रकार संघटनात्मक एकजूट आणि कार्यक्षम नेतृत्वाचा प्रभाव अधोरेखित होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

You may have missed

error: Content is protected !!