पुतण्याचा खुन करुन पळुन जानाऱ्या काकाला काहि तासातच पकडले चिखली डि बी पथकाने
Oplus_16908288
चिखली( एकनाथ माळेकर )२२/०१/२०२६ रोजी फिर्यादी रामचंद्र मारोती जाधव रा हातणी यांनी पोलीस स्टेशन ला येवुन तोडी रिपोर्ट दिला की, दि २१/०१/२६ रोजी सांयकाळरी ०७/३० वाजताच्या दरम्यान आपल्या घरात जेवन करत असतांना फिर्यादीचा मुलगा विनोद जाधव हा घरी आला व त्याची पत्नी सौ. मिरा हिचे सोबत घरगुती कारणावरुन भांडण करु लागला तसेच फिर्यादीला सुध्दा शिवीगाळ करु लागला फिर्यादी हे जेवणाचे ताट घेउन आरोपी व त्याचे पत्नीचे भांडण सोडविण्या करीता गेले असता फिर्यादीचे सुन सौ मिरा हिने फिर्यादीला तुम्ही आमच्या मधात बोलु नका तिकडे जा असे म्हटले तेव्हा फिर्यादीचा आवाज येकुन फिर्यादीचा नातु गोपाल अजाबराव जाधव हा घरात आला व त्याने फिर्यादीचा मुलगा विनोद व सुन मिरा यांना भांडण करु नका तुमच्या नेहमीच्या भांडणामुळे समाजात बदनामी होत आहे तुम्हाला वाद करायचे असतील तर या घरात राहु नका असे मिरा ला रागावून बोलला सायंकाळी झालेल्या वादात गोपाल हा विनोद व त्याचे पत्नीला बोलल्याचा राग मनात धरुन विनोद ने गोपाल ला कुऱ्हाडीने मारहाण करुन जिवानीशी ठार मारले आहे. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरुन अप क्र ६०/२६ कलम १०३ (१), ३५२ भा. न्याय संहीता प्रमाणे गुन्हा दाखल करुन तपास पोउपनि भागवतकर यांचे कडे देण्यात आला असता.
सदर गुन्हयाचे संबंधाने ठाणेदार मा पो. नि. भुषण गावंडे साहेब यांनी गुन्हयाचे गांभीर्य पाहिले असता पोलीस स्टेशन डि.बी. पथक यांना आरोपी शोधकामी व तपासाच्या सुचना दिल्या असता पोउपनि भागवरकर पोउपनि चौहान पोहेकॉ विजय किटे बीट अमलदार पोना अनिल वाघ, अमोल इंगळे, ज्ञानेश्वर शिंदे तसेच डि.बी. पथकाचे पोना अमोल गवई, पोकॉ प्रशांत धंदर, राहुल पायघन, अजय इटावा असे पो स्टाफ सह घटनास्थळी जावुन पाहणी केली असता मृतक गोपाल जाधव हा घरामधे रक्ताचा थोरोळ्यात पडलेला होता तसेच गावातील नागरीकांना आरोपी बाबत विचारपुस केली असता आरोपी विनोद उर्फ रामचंद्र जाधव हा पोलीस येण्याची माहिती मिळाली वरुन हा अंधाराचा फायदा घेवुन घटनास्थळावरुन पळुन गेल्याची माहिती मिळाल्यावरुन चिखली पोलीस स्टेशन डि बी पथक यानी रात्रीचा वेळी हातनी शिवारातील सर्व परीसर पिंजुन काढला तसेच आजुबाजुच्या शेतात पाहणी केली असता गुन्हयातील आरोपी विनोद उर्फ मंत्री मंकयाच्या शेतामध्ये अंधाराचा फायदा घेवुन लपुन बसलेला होता त्यावेळी त्याला डि बी पथकानी शिताफिने ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिल्याने आरोपी यास पो स्टे आणुन हजर केले असता त्याला गुन्हयात अटक करण्यात आली असुन त्यास वि.न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही मा पोलीस अधिक्षक निलेश तांबे साहेब बुलडाणा, अपर पोलीस अधिक्षक अमोल गायकवाड साहेब बुलडाणा, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील साहेब बुलडाणा यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. भुषण गांवडे यांचे नेतृत्वात पोउपनि भागवरकर, पोउपनि चौहान पोहेकों विजय किटे बीट अमलदार पोना अनिल वाघ पोका सुनिल राजपुत अमोल इंगळे ज्ञानेश्वर शिंदे ब न ५७३ तसेच डि.बी. पथकाचे पोना अमोल गवई पोकॉ प्रशांत धंदर पोकॉ अजय इटावा राहुल पायघन पोलीस स्टेशन चिखली यांनी केली आहे.
