चिखली तहसील कार्यालयामार्फत ‘समाधान शिबिराचे’ आयोजन; नागरिकांनी लाभ घेण्याचे चिखली तहसिलदार विजय सवडे यांचे आवाहन
चिखली (एकनाथ माळेकर)
सर्वसामान्यांचे प्रश्न स्थानिक पातळीवर सुटावेत आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळावा, या उद्देशाने चिखली तहसील कार्यालयाच्या वतीने विशेष 'समाधान शिबिराचे' आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दि.29 जानेवारी 2026 रोजी 1. चांधई मंडळातील पळसखेड 2.उदयनगर मंडळातील उदयनगर 3. शेळगाव आटोळ मंडळातील देऊळगाव धनगर 4. एकलारा मंडळातील एकलारा येथे दि.30 जानेवारी 2026 रोजी 1. अमडापूर मंडळातील इसोली 2.धोडप मंडळातील डोंगरशेवली 3. पेठ मंडळातील मंगरूळ नवघरे 4. हातणी मंडळातील हातणी येथे तसेच दि.31 जानेवारी 2026 रोजी 1.कोलारा मंडळातील कोलारा 2.मेरा खुर्द मंडळातील मेरा खुर्द 3. चिखली मंडळातील चिखली या 11 मंडळामध्ये आयोजित करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अंतर्गत शेतकरी व नागरिकांना खालील नमूद योजनांचा लाभ प्रदान करण्यात येणार आहे.
फेरफार अदालत घेणे :प्रलंबित नोदणीकृत व अनोदणीकृत फेरफार मंजूर करणे
पंतप्रधान आवास योजना व इतरा राज्य स्तरीय घरकुल योजने अंतर्गत मंजूर घरकुल यांना 5 ब्रास प्रती घरकुल या प्रमाणे मोफत वाळू उपलब्ध करणे व त्याबाबत अर्ज मंजुरी देणे
PM किसान योजनेतर्गत पात्र शेतकरी यांचे land seeding करणे
नैसर्गिक आपत्ती मध्ये नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांचे eKYC करणे व उर्वरित शेतकरी यांची यादी अपलोड करणे
डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ फेरफार वाटप करणे
Agristack अंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक (farmer ID) तयार करणे
नवीन आधार नोंदणी व आधीचे आधार अद्यावत करून देणे,
उत्पन्न दाखला/जात प्रमाणपत्र/ नॉनक्रिमिलेर प्रमाणपत्र /राष्ट्रीयत्व,वय,अधिवास प्रमाणपत्र /शेतकरी दाखला /भूमिहीन दाखला/ऐपत प्रमाणपत्र ई. प्रमाणपत्र प्रदान करणे,
मतदान कार्ड वाटप करणे, आधार मतदान कार्ड जोडणी करणे,
विशेष सहाय योजना लाभ देणे,
संजय गांधी निराधार योजनेबाबत आधार validation बाबत कार्यवाही करणे.
मोजणी शिट क प्रत वाटप करणे.
पुरवठा विभागांमार्फत नवीन रेशन कार्ड /रेशन कार्ड दुरुस्ती/नाव कमी करणे नुसार digital Ration card प्रदान करणे
रेशन कार्ड बाबत eKYC करणे.
गावातील अकुशल व्यक्तींना जॉबकार्ड प्रदान करणे,
आभा कार्ड प्रदान करणे
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना/महात्मा फुले जन आरोग्य योजना लाभ देणे,
आरोग्य तपासणी व लसीकरण,
महा DBTपोर्टल वर खालील वैयक्तिक लाभाचे योजनाचे लाभ देणे (फळ बाग लागवड, कृषी यांत्रिकीकरण, कोल्ड स्टोरेज,सेडनेट, पॉलीहाउस, सिंचन साधने, शेत तळे इत्यादी)
पंतप्रधान आवास योजना व इतर राज्यस्तरीय घरकुल योजनेतर्गत लाभ प्रदान करणे.
ग्रामविकास विभागातर्फे वैयक्तिक लाभाचे/योजनाचे लाभ प्रदान करणे,
जन्म / मृत्यू नोंद , विवाह नोंदणी प्रमाणपत्र प्रदान करणे.
श्री. विजय सवडे तहसीलदार चिखली यांनी माहिती दिली की, “प्रशासनाला लोकांच्या दारी नेणे हा या शिबिराचा मुख्य हेतू आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना साध्या कामांसाठी वारंवार कार्यालयात येण्याची गरज पडू नये, यासाठी सर्व संबंधित अधिकारी एकाच ठिकाणी उपस्थित राहणार आहेत.”या समाधान शिबिरासाठी चिखली तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपले आवश्यक कागदपत्रे घेऊन उपस्थित राहावे आणि शासनाच्या या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसील प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
