ज्ञानेश्वर विद्यालय, धोत्रा नाईक येथे अरूणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान अंतर्गत जनजागृती….

Oplus_0

Oplus_0

धोत्रा नाईक( बुलढाणा माझा न्युज ) 23/01/2026 रोजी ज्ञानेश्वर विद्यालय, धोत्रा नाईक येथे अरूणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान अंतर्गत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. हे अभियान दिनांक 15 जानेवारी ते 07 फेब्रुवारी 2026 या कालावधीत राबविण्यात येत असून, 0 ते 40 वर्षे वयोगटातील सर्व नागरिकांच्या घरोघरी जाऊन तपासणी तसेच शाळेतील विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येणार असल्याची सविस्तर माहिती उपस्थितांना देण्यात आली.
या कार्यक्रमात सिकलसेल आजाराची लक्षणे, तपासणीचे महत्त्व, प्रतिबंधात्मक उपाययोजना व उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नागरिकांनी व पालकांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक भागवत शेळके, सहशिक्षक प्रविण कुमार होने, बेबी अंभोरे, सुनीता जाधव, संदीप खडे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, उदयनगर येथील आरोग्य कर्मचारी विनोद इंगळे, भारती थोरात, आशा स्वयंसेविका मीना मोरे आणि आ. स. राजेंद्र जुमडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळा प्रशासन व आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

You may have missed

error: Content is protected !!