नागरे महाविद्यालयामध्ये दोन दिवसीय राष्ट्रीय मूल्यांकन कार्यशाळेचे आयोजन

Screenshot_2026-01-24-14-57-11-02_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

सिंदखेडराजा (अनिल दराडे) संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती अंतर्गत भगवान बाबा शिक्षण प्रसारक मंडळ रूमनाद्वारा संचलित नारायणराव नागरे महाविद्यालय दुसरबीड तालुका-सिंदखेड राजा जिल्हा-बुलढाणा येथे दिनांक 05 व 06 जानेवारी 2026 रोजी दोन दिवसीय नॅक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात Faculty Enhancement Program घेण्यात आले या प्रोग्राम अंतर्गत NEP – NAAC तसेच Enhancement of Academic Excellence या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. एस. एन. धर्माधिकारी सर उपस्थित होते त्यांनी आपल्या भाषणात सर्व प्राध्यापकांना जे काही बदल घडले त्या संदर्भात मार्गदर्शन केलं. तसेच त्यातील महत्त्वाचा मुद्दा IKS – Indian Knowledge System हे किती महत्त्वाचे आहे ते पटवून दिले यानंतर NAAC संदर्भात त्यांनी सर्व प्राध्यापकांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच नॅक मध्ये करावे लागणारे काम त्यांनी खोलवर जाऊन स्पष्ट केले . या कार्यक्रमासाठी लाभलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय नागरे अधिसभा तथा व्यवस्थापन परिषद सदस्य संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती हे उपस्थित होते.
कार्यशाळे करिता उपस्थितांमध्ये प्रा. डॉ. पंढरी डोईफोडे (संत भगवान बाबा महाविद्यालय सिंदखेडराजा) प्रा. सौ. संगीता वळसे (संत भगवान बाबा महाविद्यालय सिंदखेडराजा) प्रा.डॉ. दिपक देशमाने प्रा. दिलीप नाईकवाड प्रा. एस. आर. वाघ प्रा. पी.पी. सानप प्रा. बी. डी. शिंदे प्रा. मिलींद गवई प्रा. एम. व्ही. काळुसे प्रा. जगदीश यादव प्रा.डी.बी. नागरे प्रा.सत्यम श्रीवास्तव प्रा. मेहेर प्रा. नयना गवारे प्रा. राम पोखरकर प्रा. सुशांत गुंजाळ श्री. बाळासाहेब पंढरे श्री. गजानन मुंढे श्री. अनिल रणमळे श्री. अनिल गायकवाड उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा प्रास्ताविक प्रा. डॉ. दिपक देशमाने यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ. गणेश घुगे यांनी मानले.

You may have missed

error: Content is protected !!