ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष पदी दिलीप वनवे यांची नियुक्ती,राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांनी पत्रकान्वये केली नियुक्ती.
बुलढाणा (एकनाथ माळेकर) जिल्ह्यातील ग्राहकांच्या विविध समस्या सोडविणे यासाठी कार्यरत असलेली भारत सरकार नोंदणीकृत भारत सरकार माणुसकी सोशल फाउंडेशन संचालित ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष पदी बायगांव बु पत्रकार दिलीप वनवे यांची नव्याने नियुक्ती झालेली आहे. ही नियुक्ती ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे तसेच राष्ट्रीय सचिव अविनाश झोटिंग यांनी केली आहे. तसेच विदर्भा ध्यक्ष सचिन खंडारे, विदर्भ कार्याध्यक्ष सुनील अंभोरे बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉ.शालिग्राम चव्हाण, डॉ.गंगाराम उबाळे यांच्या मार्ग दर्शनातून ही नियुक्ती
झालेली आहे. बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष पदी बायगांव बु.चे पत्रकार दिलीप वनवे यांचा सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रात दांडगा अनुभव असून त्यांनी माजी उपसरपंच तथा तसेच सध्या ते ग्रा.पं. सदस्यपती असून दै.लोकपरिवर्तन या वर्तमान पत्राचे पत्रकार म्हणून काम पाहत आहेत. त्यामुळे त्यांच्या या कामाचा नक्कीच जनतेच्या तसेच ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी फार मोठी मदत व फायदा होणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील ग्राहकांना न्याय देण्याचे काम भविष्यात करेल अशी ग्वाही दिली. माझी निवड बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष पदी केल्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे तसेच राष्ट्रीय सचिव विदर्भ अध्यक्ष व बुलढाणा जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांचे त्यांनी आभार मानले आहे. त्यांच्या या ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती जिल्हा बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष पदी निवडीमुळे दे. राजा तालुक्या तुन तसेच सर्वचस्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे….
