सरकारी कामात अडथळा आणि विनयभंगाच्या आरोपातून पत्रकार अजहर शेख यांची अखेर निर्दोष मुक्तता…..
चिखली:- तालुक्यतील एकलारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मध्ये सरकारी कामात अडथळा आणणे, खंडणी मागणे आणि महिलेचा विनयभंग केल्याच्या गंभीर आरोपातून अजहर शेख याची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. (जिल्हा सत्रन्यायालय बुलढाणा) येथील न्यायाधीशांनी हा निकाल दिला असून, बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरला आहे.
प्रकरणाचा थोडक्यात तपशील तक्रारदार सरकारी कर्मचारी डॉक्टर प्रा आ आरोग्य केंद्र एकलारा यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की,आरोग्य केंद्र एकलारा येथे माझी ओपीडी ड्यूटी सुरू असतांना आरोपीने माझ्या सरकारि कामात अडथळा आणला आणि शिवीगाळ करत झटापट केली
या प्रकरणातील फिर्यादीनुसार, अजहर शेख याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा (कलम ३५३), पैशांची मागणी करून धमकी दिलण्याचा (कलम ३८४), जीवे मारण्याची धमकी दिल्याचा (कलम ५०६) आणि अश्लील भाषेचा वापर करून विनयभंग केल्याचा (कलम ५०९) गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून दोषारोपपत्र दाखल केले होते.
बचाव पक्षाचा प्रभावी युक्तिवाद
या खटल्यात आरोपीच्या वतीने ॲड. राजमोहम्मद शेख यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की:
तक्रारदाराने केलेले आरोप हे केवळ आकसापोटी आणि पूर्वग्रहातून करण्यात आले आहेत.
घटनेच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या साक्षीदारांच्या जबानीत कमालीची विसंगती आहे.
सरकारी कामात अडथळा निर्माण झाल्याचा कोणताही ठोस पुरावा किंवा सीसीटीव्ही चित्रीकरण पोलीस सादर करू शकले नाहीत.
विनयभंग आणि खंडणीच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसून, आरोपीला खोट्या प्रकरणात अडकवण्यात आले आहे
न्यायालयाचा निर्णय
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि सादर केलेले पुरावे विचारात घेऊन, न्यायालयाने ॲड. राजमोहम्मद शेख यांचा युक्तिवाद मान्य केला. सरकारी पक्ष आरोपी अजहर शेख याच्यावर लावलेले आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचे ताशेरे ओढत, न्यायालयाने त्याची सर्व आरोपांतून सन्मानपूर्वक मुक्तता केली सत्याचा विजय झाला असून, केवळ आकसापोटी दाखल केलेल्या खोट्या तक्रारीमुळे झालेला मानसिक त्रास या निकालामुळे दूर झाला आहे.”
