शेतकरी नेते सहदेव लाड यांच्या आंदोलनाच्या धसक्याची पंचायत समिती विभागाकडून दखल एक फेब्रुवारी रोजी खंडाळा ते चोरपांग्रा शेत रस्त्याचे काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन ,शेतकऱ्यांचे उद्या होणारे जलसमाधी आंदोलन तूर्तास स्थगित

Screenshot_2026-01-25-18-26-28-19_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7


बिबी ( जयजीत आडे ) खंडाळा शिवरस्ता ते चोरपांग्रा तलावाकडे जाणाऱ्या अपूर्ण रस्त्याचे काम 25 जानेवारीपर्यंत मार्गी न लागल्यास 26 जानेवारी रोजी शेतकऱ्यांसह चोरपांग्रा तलावामध्ये जलसमधी आंदोलन करण्याचा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी दिला होता या आंदोलनाच्या धसक्याची पंचायत समिती बांधकाम विभागाकडून दखल घेत येत्या 1 (एक )फेब्रुवारी पर्यंत सदर रस्त्याचे अपूर्ण काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन सहदेव लाड यांना पंचायत समिती विभागाकडून देण्यात आले आहे त्यामुळे उद्या होणारे जलसमाधी आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे परंतु पंचायत समिती विभागाने दिलेला शब्द न पाळल्यास यापेक्षा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी नेते सहदेव लाड यांनी दिला आहे,

You may have missed

error: Content is protected !!