शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बुलढाणा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
बुलढाणा:- येथे नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्वतंत्र भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बुलढाणा या संस्थेचे अधिष्ठाता डॉ. कैलास झिने सर तसेच जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रशांत पाटील सर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कैलास झिने सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी डॉक्टर कैलास झिने सर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर माहिती दिली. यावेळी प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष एमबीबीएस चे विद्यार्थी मयुरी पांडे , मुस्कान, ऐश्वर्या खरवडे, गौरव चौधरी, सौरभ जोशी , गजानन शिंदे आदींनी देशभक्तीपर गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक तसेच सूत्रसंचालन श्री राजू काटोले यांनी केले. यावेळी डॉ. मोहम्मद लईक, डॉ. निखिल नलावडे, डॉ. राजेंद्र बेदमुथा, डॉ. अजीत शिरसाठ, डॉ.निखिल बोथरा,डॉ. दिपाली कोथळकर , डॉ . सुनील विधाते, डॉ. अर्चना टेकाळे, डॉ. प्राची तायडे, डॉ. आशिष लोखंडे, डॉ. रेश्मा खरात,डॉ. मधुसूदन सावळे, डॉ. पूजा निकस श्री सोमनाथ माठे, प्रशासकीय अधिकारी, यांच्यासह शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर, परिचारिका, कंत्राटी स्टाफ तसेच एमबीबीएस प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री राहुल जाधव, श्री प्रमोद भोपळे, योगेश बघे, कुणाल गवई, श्री सुरेश बेंडवाल,श्री गजानन भोरकडे,श्री अविनाश हिवाळे यांनी परिश्रम घेतले.
