श्री गजानन महाराज सांस्कृतिक आश्रम बहुउद्देशीय संस्थेचाआदर्श शिक्षक पुरस्कार सौ विद्या दत्तात्रय खरात यांना प्रदान
सिंदखेडराजा (अनिल दराडे) सिंदखेडराजा तालुक्यातील पिंपळगाव लेंडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंपळगाव लेंडी या ठिकाणी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी तेथील शाळेवर कार्यरत जिजाऊ सावित्री कर्मयोगिनी पुरस्कार प्राप्त सहाय्यक शिक्षिका सौं विद्या दत्तात्रय खरात यांच्या कार्याचा श्री गजानन महाराज सांस्कृतिक आश्रम बीबी ,तालुका लोणार यांचे कडून, आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. ज्ञानदानाचे अतुलनीय व उत्कृष्ट कार्य तसेच त्यांच्या सामाजिक कार्या बद्दल त्यांना हा पुरस्कार 26 जानेवारी 2026 रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंपळगाव लेंडी या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात प्रदान करण्यात आला. याप्रसंगी श्री गजानन महाराज सांस्कृतिक आश्रमाचे उपाध्यक्ष श्री गोविंदभाऊ राजाराम टेके व त्यांच्या पत्नी सौं आशा गोविंदराव टेके यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रणवीर भाऊ इंगळे सरपंच श्री अंबादास लबडे सर्व सन्माननीय सदस्य व गावकरी उपस्थित होते चार महिन्यापूर्वी रुजू झालेल्या या शिक्षकांनी शाळेचा जो कायापालट केला त्याबद्दल गावकऱ्यांनी व व्यवस्थापन समितीने समाधान व्यक्त केले . शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांच्याकडूनही श्री रवींद्र मापारी सर श्री एकनाथ मेहेत्रे सर श्री शिवहरी कायंदे सर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात ऋआला. या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठीश्री संतोषभाऊ टेके, श्री भाऊसाहेब टेके श्री अरुणभाऊ गायके ,श्रीमंतभाऊ गायके ,लक्ष्मणभाऊ गायके ,श्री फटपुरे श्री सतीश लबडे यांनी परिश्रम घेतले.
