नागरे महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
सिंदखेडराजा( अनिल दराडे) दुसरबीड येथील स्थानिक नारायणराव नागरे महाविद्यालयात 77 वा प्रजासत्ताक दिन प्रसंगी ध्वजारोहण कार्यक्रमासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करून उत्साहात संपन्न झाला.
सर्वप्रथम दुसर बीड येथील सुप्रसिद्ध डॉ. दशरथजी शिंदे साहेब यांचे शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय नागरे तथा व्यवस्थापन परिषद सदस्य (सं. गा. ब अ.वि .अमरावती) प्रा. सौ. धनश्री ताई कायंदे (संचालक भ. शि. प्र. मंडळ रूमना) डॉ. शरद राव मखमले (सरपंच ग्रामपंचायत दुसरबीड), अशोकराव गुंजाळ (उपसरपंच), अबरार भाई (ग्रा.पं.स), बाबुराव खंदारे ( ग्रा.पं. स), कृष्णाजी जराड (ग्रा.पं.स), विलासराव देशमुख (पं.स.माजी सभापती) छगनराव खंदारे (माजी सरपंच), शेख अन्सार भाई (ग्रा.पं. स), गजानन मखमले (पोलीस पाटील) बाजीराव वाघ (माजी सरपंच), उत्तमराव देशमुख, बाळासाहेब मोहिते (माजी सरपंच), कचरुजी भारस्कर (माजी पं. स. स.), प्रा.सानप (माजी प्राचार्य), डीपी नागरे (माजी मुख्याध्यापक), बबनराव सावंत ,दिलीपराव देशमुख,अनिल बुधवत, प्रा. सागर सांगळे, शिवाजी बारगजे (किनगाव राजा पोलीस स्टेशन),प्रवीण भाऊ गीते (लोकजागर विश्वस्त) गजानन आघाव, डॉ.पालवे, वैभव देशमुख, जुनेद अली, वसंतराव उदावंत, निवृत्ती भाऊ वायाळ, बाळासाहेब मोहिते (पत्रकार), इरफान भाई, रामप्रसाद मुरकुट, विजय मुरकुट, अशोकराव सोसे, बंटी छाजेड, पंजाबराव सानप, शेख इब्राहिम भाई, प्रवीण देशमुख, प्रा.वाघ, प्रा.काळुसे, आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
याप्रसंगी सर्वप्रथम उद्देशिका वाचन घेण्यात आले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांकडून कवायत करून घेण्यात आली, त्यानंतर मान्यवरांनी मार्गदर्शनपर शुभेच्छा दिल्या तर प्रमुख पाहुणे डॉ. दशरथ शिंदे साहेब यांनी जातीयवाद, धर्मवाद, प्रादेशिकवाद, अशा सर्व प्रकारचे वाद संपवून निर्विवाद पणे सर्वांनी एकसंघ होऊन प्रत्येकाने आपण ज्या क्षेत्रात काम करतो तिथे प्रामाणिक व एकनिष्ठेने काम करणे आणि विकसित, समृद्ध, सामर्थ्यशील राष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प करून राष्ट्र विकासाच्या कार्यात स्वतःला प्रत्येकाने झुकून द्यावे असे आव्हान केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर विजय नागरे यांनी अध्यक्ष समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांनी कोणत्याही व्यसनाला बळी न पडता संस्कार, नैतिक मूल्य यांचे पालन करून देशांनी आपल्याला काय दिले हे न पाहता देशासाठी आपण काय करू शकतो असे आत्मचिंतन करण्याचा उपदेश विद्यार्थ्यांना केला. सामाजिक जीवनात राष्ट्र प्रथम नंतर व्यक्ती हे तत्व पालन करावे असा सल्ला दिला.
सदरील कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते, तसेच शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.दीपक देशमाने यांनी केले तर प्रास्ताविक प्रा. डॉ. गणेश घुगे यांनी केले तर प्रा. नयना गवारे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.
