जि प म प्रा शाळा डोंगर खंडाळा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

IMG-20260127-WA0010

डोगर खंडाळा:-

      दरवर्षी प्रमाणे जि प म प्रा शाळा डोंगरखंडाळा येथे भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामपंचायत चे सर्व सदस्य उपस्थित होते
         कार्यक्रमाची सुरुवात प्रभात फेरीने झाली

शाळेचे ध्वजारोहन शा व्य स अधक्ष श्री गणेश काकडे यांनी केले . प्रजासत्ताक दिना निमित्य शाळेत छोट्या खानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शा व्य स अध्यक्ष गणेश काकडे होते . प्रमुख पाहूणे म्हणून डोंगर खंडाळा गावाचे सरपंच प्रज्ञाताई कांबळे ह्या होत्या प्रमुख उपस्थिती म्हणून डोंगरखेडाळा गावचे उपसरपंच श्री श्याम सावळे, श्री प्रशांत भंडारे . श्री मोरे साहेब (ग्राम विकास अधिकारी ) श्री सुनिल चव्हाण, श्री माणिकराव सावळे, श्री वसंतराव चव्हाण सौ भारती कुसळकर, सौ कोमल ताई मांडवे तथा श्री गणेश गाढवे ग्रामपंचायत सदस्य व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अंगणवाडी सेविका, मदतनिस व गावातील प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते
या कार्यक्रमाची सुरवात देशभक्ती गीत कवायतीने झाली त्यानंतर विद्यार्थ्यांची भाषणे झाली काही देशभक्तीपर गीतावर समुह नृत्य सादर करण्यात आली. ग्राम पंचायत तर्फ शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी शाळेची आवश्यकता बघून स्नेहा सिद्धार्थ भंडारे यांचेकडून शाळेसाठी स्वखर्चाने प्रवेशद्वार बांधून देण्याचे जाहीर केले. त्याच प्रमाणे गावचे उपसरपंच श्याम बळीराम सावळे यांनी सुद्धा शाळेसाठी एक सुसज्ज असा रंगमंच स्वखर्चातून बांधून देण्याचे जाहीर केले केले तसेच शाळेचे माजी विद्यार्थी श्री राजेश सावळे सर (उच्च श्रेणी मु.अ जयपूर लांडे ) यांनी शाळे साठी इलेक्ट्रीक बेल देण्याचे जाहीर केले शाळेच्या मुख्यध्यापिका गुळवे मॅडमे यांनी दहा भोज पट्टया देण्याचे जाहीर केले.सरपंच प्रज्ञाताई यांनी आपल्या भाषणामध्ये शाळेच्या गुणवता वाढीवर भर दिला प्रशांत भंडारे यांनी आपल्या भाषणात शाळेच्या विकासासाठी सदैव तत्पर असल्याचे सांगीतले.
कार्यक्रमाच्या सुत्रसंचलनाची धुरा श्री आराख सर यांनी सांभाळली आभार प्रदर्शनान गुळवे मॅडम यांनी ग्रामपंचायत यांच्या सहकार्याचा उल्लेख करत सर्व मान्यवरांचे आभार मानले कार्यक्रम यशस्वीते साठी आराख मॅडम, सय्यद सर व जाधव सर यांनी परिश्रम घेतले

You may have missed

error: Content is protected !!