महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विमान अपघातात निधन
सिंदखेडराजा (अनिल दराडे )सिंदखेडराजा येथे मा जिजाऊ राजवाडया जवळ महाराष्ट्र राज्य चे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार दादा यांना सर्व पक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या वेळी छावाचे जिल्हा अध्यक्ष अशोकराव व नवनिर्वाचित अध्यक्ष तायडे व नगरसेवक संदिप मेहेत्रे व इतर पदाधिकारी बाजार होते स्थानिक चया वतीने सिंदखेडराजा बंद ठेवण्यात आला होता सर्व यापारी बंधुंना सहकार्य करुन सिंदखेडराजा कडकडित बंद करून जड अंतःकरणाने दादा ना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. लँडिंगच्या वेळी विमानाला आग लागल्याने विमानातील सर्व 6 जणांचा मृत्यू झाला.
अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेता होते आणि 1991 पासून बारामती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून काम केले होते.
विमान अपघाताची खबर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली गेली आहे. अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात शोककळा पसरली आहे.
