सेवाशक्ती संघर्ष एस.टी.कर्मचारी संघ,महाराष्ट्र राज्याची मेहकर आगाराची कार्यकारणी घोषित.अध्यक्षपदी तेजराव तेजनकर तर सचिव पदी गजानन धोटे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड
सिंदखेडराजा (अनिल दराडे) भारतीय जनता पार्टीची अंगीकृत असणारी सेवाशक्ती संघर्ष एस.टी.कर्मचारी संघ,महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मा.आ.गोपीचंद पडळकर तसेच मुख्य कार्याध्यक्ष मा.आ.सदाभाऊ खोत तर सरचिटणीस मा.सतीशजी मेटकरी यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक आगारामध्ये व विभागांमध्ये नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या निवडी मोठ्या जल्लोषात होत असल्याने दि.27 जानेवारी 2026 रोजी बुलढाणा विभागातील मेहकर आगाराची कार्यकारणी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध निवडण्यात आली.
यामध्ये निवडण्यात आलेले नवनिर्वाचित मेहकर आगाराचे आगार अध्यक्ष श्री तेजराव तेजनकर,कार्याध्यक्ष सुवर्णसिंग जाट,सचिव गजानन धोटे,सहसचिव गणेश मोसंबे,कोषाध्यक्ष नारायण साबळे,प्रसिद्धीप्रमुख गजानन उबाळे,उपाध्यक्ष भगवान कांबळे व प्रतापराव राजगुरू,महिला प्रतिनिधी शिल्पा धोटे,कर्मचारी प्रतिनिधी अंगतराव चव्हाण यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
मेहकर आगार कार्यकारिणीच्या निवडीसाठी वरिष्ठ पदाधिकारी म्हणून राज्य सरचिटणीस श्री सुनील पाटील,बुलढाणा विभागाचे ज्येष्ठ नेते श्री शिवाजी आनंदे,श्री सतीश पाटील तेजनकर,श्री सचिन लोखंडे,श्री दत्ताभाऊ ढवळे,श्री छगनराव मुळे,श्री गणेश जाधव,श्री रामेश्वर ठाकरे,श्री रवी खेडकर,श्री पुरुषोत्तम टिकार,श्री अंकुश पाटील शिंदे, संतोष सोनूने ,जि.एम.वाघमारे,राजू तळेकर,शंकर राठोड,व इत्यादी विभागीय सर्व पदाधिकारी,बुलढाणा विभागातील सर्व आगारातील पदाधिकारी आणि मेहकर आगारातील बरेच कर्मचारी हजर होते.
उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना राज्य सरचिटणीस सुनील पाटील आणि जेष्ठ नेते शिवाजी आनंदे यांनी कर्मचाऱ्यांना कुठलीही अडीअडचण येऊ देणार नाही आणि आलीस तर त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू अशी ग्वाही दिली तर सतीश पाटील तेजनकर व छगनराव मुळे यांनी सूद्धा खांद्याला खांदा लावून सोबत काम करण्याची ग्वाही दिली.तर नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहकर आगारात सभासद वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
बिनविरोध निवड झालेली नवनिर्वाचित कार्यकारणी सर्वांनमिळून मेहकर आगाराचे आगार व्यवस्थापक श्री हर्षलजी साबळे यांना देऊन नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना सहकार्य करण्याची अपेक्षा केली तर आगार व्यवस्थापक यांनी सुद्धा कोणत्याही कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही असे सांगितले.
