स्विफ्ट डिझायरची ॲटोला भीषण धडक१ महिला ठार, ८ महिला गंभीर जखमी…..

Screenshot_2026-02-01-14-18-45-07_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91

लोणार (जयजित आडे) तालुक्यातील किनगावजटू येथून मातमळकडे नेट च्या कामासाठी महिलामजूर घेऊन जाणाऱ्या ॲटोला भरधाव वेगातील स्विफ्ट डिझायर कारने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. ही घटना रविवारी (१ फेब्रुवारी) सकाळी सुमारे ८ वाजताच्या सुमारास सरस्वती नदीजवळ बाजड यांच्या शेतालगतच्या वळणावर घडली.या अपघातात जरीनाबी अय्युबशहा (वय ४५) या महिलेचा जागीच मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. धडकेनंतर ॲटो पलटी झाल्याने त्यातील महिलामजूर रस्त्याच्या बाजूला फेकल्या गेल्या.जखमींमध्ये रंजना परमेश्वर कास्तोडे (५३),शांताबाई शेवाळे (४५),कल्पना विठ्ठल जमधाडे (४०),अलका मधुकर शेवाळे (४०),लक्ष्मण बबन करवते (४५),चंद्रभागा गजानन नागरे (४०),
राधा गजानन गायकवाड तसेच ॲटोचालक आसिफ निंशालशहा (३०) यांचा समावेश आहे.
अपघातानंतर स्विफ्ट डिझायर कारचा चालक घटनास्थळावरून फरार झाला असून संबंधित कार (क्र. MH43 AF 5821) ही हिंवराखंड येथील असल्याची माहिती आहे. तर अपघातग्रस्त ॲटोचा क्रमांक MH28 R 2211 आहे.
घटनेची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिकेद्वारे जखमींना लोणार येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे हलविण्यात आले आहे.
या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे पुढील तपास ठाणेदार प्रकाश सदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय धनंजय इंगळे हे करीत आहे.

You may have missed

error: Content is protected !!