“सरपंचांच्या निवेदनाची दखल; चिखला काकड परिसरातील रस्त्यांची झुडपे हटवून साफसफाई”
बिबी ( जयजित आडे )सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आलेल्या निवेदनाची दखल घेत संबंधित रस्त्याच्या दोन्ही बाजूंची साफसफाई करण्यात आली. अनेक वर्षापासून रस्त्याच्या दोन्ही कडेला व वळण मार्गावर लहान मोठी झाडा झुडपांची वाढ व माती साचल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता.या संदर्भात गणेश काकड सरपंच चिखला काकड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिनांक 19 नोव्हेंबर रोजी निवेदन सादर करून तातडीने साफसफाई तसेच नवीन डांबरीकरण करण्याची मागणी केली होती. त्या निवेदनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाढलेले झाडे झुडपे कचरा हटवून परिसर स्वच्छ केला.साफसफाईमुळे रस्ता अधिक सुरक्षित व स्वच्छ झाला असून वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच डांबरीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात येईल असे सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले.या कार्यवाहीचे नागरिकांनी स्वागत केले असून डांबरीकरणाचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे अशी मागणी होत आहे. भविष्यातही नियमित देखभाल करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
